कांगोणीत महिलांच्या उपस्थितीमुळे शिवरायांची मिरवणूक ठरली लक्षवेधी

सोनई : –छत्रपति शिवाजी महाराज यांच्या शिवजन्मदिन उत्वव निमित्त जयंती मोठ्या थाटात सपन्न झाली. कांगोणी गावात विद्यालयतील विद्यार्थी यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा परिधान करुन मिरवणुकीने, महीला मंडळी फुगडी सांस्कृतिक कार्यक्रमने सागता करण्यात आली.
आ.शंकारराव गडाख यांच्या मार्गदर्शनखली, युवा नेते उदयन गडाख व ज्यांच्या पुढकराने शिवजयंती सोहळाचे आयोजन केले जिल्हा परिषद सदस्य सुनील भाऊ गडाख यांच्या उपस्थित शिवभक्तांनी सकाळी मोटार सायकल रॅली काढली तद्नंतर मा. सुनील भाऊ गडाख यांच्या हस्ते महाराजांच्या मुर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिषेक व आरती करण्यात आली.
सायंकाळी पारंपारिक वाद्य ढोल सनई चौघडे व बॅन्ड व बहुसंख्य महिलांच्या उपस्थित मिरवणूक मोठ्या थाटात पार पडली.
महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच रोहिणी ताई कराळे यांनी महीलांचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमासाठी शिवजयंती उत्सव समिती तरुण वर्ग सरपंच सोमाभाऊ कराळे मित्र मंडळ महीला बचत गट व लोकनियुक्त सरपंच रोहिणीताई कराळे सोसायटीचे चेअरमन दुर्योधन सोनवणे व्हा.चेअरमन सुभाष भालेकर संतोष ठोंबळ आदीनाथ रौंदळ एकनाथ रौंदळ पोपट ठोंबळ बजरंग तुपे माणिकराव कर्डिले सोपान शिंदे पोपट कराळे कंकर वडागळे सर कडुभाऊ गायकवाड योगेश पुंड अशोक चौधरी अकील भाई शेख आदींनी सहकार्य केले.