अकोले /प्रतिनिधी-
सत्यनिकेतन संस्थेचे नानासाहेब विठोबा देशमुख सर्वोदय विदया मंदिर कातळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली..
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक बादशहा ताजणे हे होते. याप्रसंगी गोरक्ष मालुंजकर,अनिल पवार,किशोर देशमुख,सचिन लगड,धनंजय मोहंडूळे,अनिता जंबे यांसह विदयार्थी उपस्थित होते.
,शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करण्यासाठी प्रेरित करते.स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य,आपल्याला स्वराज्याचे रक्षण करायचे असेल तर किल्ले हवेत असे महाराजांना वाटत असे.किल्ले काबीज करण्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या त्या यशस्वीपणे पूर्ण केल्या.असल्याचे विचार व्यक्त करत प्रा केले.स्वराज्य शपथ,तोरणा किल्ल्याची पहिली लढाई,राज्याचा विस्तार,अफजलखानाचा वध,पन्हाळा वेढा,सुरतची लूट,पुरंदरचा पट,आग्राला भेट,राज्याभिषेक,दक्षिण मोहीम,महाराजांवर लिहिलेली पुस्तके आदींची माहीती प्रा. संतराम बारवकर यांनी दिली
अध्यक्ष बादशहा ताजणे हे बोलताना म्हणाले की,शिवरायांनी व मावळ्यांनी सैन्यात जातीभेद व धर्मभेद मानला नाही.स्वराज्यातील सर्व कायदे व नियम मावळ्यांनी मानले म्हणून आपल्या माणसांचे स्वराज्य निर्माण झाले.म्हणूनच शिवरायांचा सबंध इतिहास आजच्या तमाम भारतीयांना जगण्याचा आदर्श असल्याचे विचार व्यक्त केले.
प्रा.सचिन लगड यांनी बोलताना माँ जिजामातेच्या संस्कारांमुळे शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली.काम करा,कष्ट करा,कर्तव्य करा मग खा.घरात निट रहा,गर्व येऊ देऊ नका.कधीच कोणाचे चमचे होऊ नका.जो कधीच चमचा झाला नाही,तो एक दिवस छत्रपतीच होणार असे विचार व्यक्त केले.
विदयार्थी रोशन कोकतरे याने आपले विचार व्यक्त केले.रूख्मिनी धोंगडे,पुजा ढगे,भाग्यश्री ढगे,अपूर्वा भवारी यांनी शिवाजी महाराजांचा पाळणा सादर केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर देशमुख यांनी केले.सुत्रसंचलन गोरक्ष मालुंजकर यांनी केले.तर अनिल पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
