भिंगार अर्बन बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन झोडगे यांचा निमगाव फाटा व नेप्ती ग्रामस्थांनी केला सत्कार

भिंगार अर्बन बँकेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध: चेअरमन झोडगे
अहमदनगर :नगर कल्याण रोडवरील निमगाव फाटा येथे भिंगार अर्बन बँकेच्या चेअरमनपदी अनिल झोडगे व व्हाईस चेअरमन पदी किसनराव चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल वेताळ बाबा मित्र मंडळ, समता परिषद, पुंड परिवार व निमगाव फाटा तसेच नेप्ती ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित चेअरमन व व्हॉईस चेअरमन तसेच संचालक एकनाथ जाधव व अमोल धाडगे यांचा नंदनवन उद्योग समूहाचे संचालक बाबासाहेब जाधव यांच्या हस्ते सन्मान करून सत्कार करण्यात आला.
भिंगार अर्बन बँकेवर ज्या पद्धतीने सभासदांनी व खातेदारांनी विश्वास दाखवला आहे .हाच विश्वास आमच्या कामाची पावती आहे. बँक आपली नियमित प्रगती करत आहे. भिंगार अर्बन बँक तळागाळातील घटकांसाठी महत्त्वपूर्ण ठरली आहे. या बँकेला लोकसेवेचा वसा आहे. ग्राहकांना वेगवान सेवा देण्यासाठी व बँकेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन भिंगार अर्बन बँकेचे नवनिर्वाचित चेअरमन अनिल झोडगे यांनी केले
.यावेळी माजी सरपंच अंबादास पुंड, पोलीस पाटील अरुण होले, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड संतोष चौरे , प्रा. भाऊसाहेब पुंड ,रामदास फुले, सुरेश पुंड, डॉ .बंडोपंत पुंड,नेप्ती समता परिषद शाखा अध्यक्ष शाहूराजे होले , निमगाव फाटा शाखा अध्यक्ष हरिभाऊ पुंड,राजू पुंड, भानुदास फुले, संतोष पुंड,अमोल पुंड ,रवी पुंड, निलेश पुंड,संतोष लोंढे, सचिन पुंड ,गणेश पुंड ,गणेश फुले,सौरभ भुजबळ, नितीन शिंदे,ओंकार भुजबळ,आदित्य पुंड, दादा होले, रमेश रावळे व पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
