मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत सर्वोदय विदयालयस तीन लाख रूपयाचे बक्षीस जाहीर.

राजूर/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील राजूर येथील सत्यनिकेतन संस्थेचे गुरुवर्य रा.वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानांतर्गत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे
.तसेच महालक्ष्मी विदयालय पिंपळगाव नाकविंदा या विद्यालयाचा द्वितीय क्रमांक तर धर्मवीर अनंत दिघे इंग्लिश मेडीयम स्कुल विरगावला तृतिय क्रमांक मिळाला आहे.
जिल्हा परिषद शिक्षण विभाग तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अहमदनगर,पंचायत समिती यांचे मार्फत तालुकास्तरीय मुल्यांकन समिती यांनी प्रत्यक्ष तालुकास्तरीय तसेच केंद्रस्तरीय तपासणी केली.या मुल्यांकन समितीने विद्यार्थ्यांचा विविध उपक्रमातील,व्यवस्थापनातील व निर्णय प्रक्रियेतील सहभाग,शैक्षणिक गुणवत्ता व व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक अवांतर उपक्रम,विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती,शाळेची इमारत व परिसराची स्वच्छता,राष्ट्रीय एकात्मतेस प्रोत्साहन देण्याबाबतचे उपक्रम,विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन,आर्थिक साक्षरता व कौशल्य विकास,प्लास्टीक मुक्त शाळा,व्यवसाय शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठीचे मार्गदर्शन व्याख्यान,गुणवत्ता विकास,भौतिक विकासात सहभाग,तंबाखू मुक्त शाळा, उत्कृष्ट पोषण आहार,शाळा व्यवस्थापन समिती,एनजीओ सहभाग,पालक मित्र,माझी विद्यार्थी सहभाग आदि बाबनिहाय गुणदान करण्यात आले.
यामध्ये सदर विदयालयाने तालुकास्तरावर उच्चांक गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकविला असून सदर विद्यालयाची जिल्हास्तरीय तपासणी करण्यात आली आहे असे विद्यालयाचे प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी सांगितले .
अकोले तालुक्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,सर्व आश्रमशाळा हे या स्पर्धांत सहभागी होते.या सर्व शाळांमध्ये सर्वोदय विद्यालयाने ग्रामीण भागात शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.या विद्यालयात माध्यमिक विदयालयात ९७२ व उच्च माध्यमिकमध्ये ८७१ असे एकूण १८४३ विद्यार्थी शिक्षण घेतात. आदीवासी भागातील हे सर्वात मोठे विद्यालय म्हणून ओळख आहे.
या विशेष निवडीबद्दल विद्यालयाचे प्राचार्य,उपप्राचार्य,पर्यवेक्षक,अधिक्षक,सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,विदयार्थी, पालक यांचे विस्तार अधिकारी सविता कचरे, गटशिक्षण अधिकारी अभयकुमार वाव्हळ,केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव,सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड.मनोहरराव देशमुख, सचिव टी.एन.कानवडे,कोषाध्यक्ष विवेकजी मदन, संचालक मिलिंदशेठ उमराणी, प्रकाश टाकळकर,अशोक मिस्त्री,विजय पवार,विलास पाबळकर,विश्वस्त एम.एल. मुठे,पी.एस.शहा, एस.टी.येलमामे, एस.टी.पन्हाळे,एन.डी.बेल्हेकर, एम.बी.वाकचौरे, आर.के.काठे,प्रकाश महाले,लहानू पर्बत,मनोहर लेंडे,बादशहा ताजणे,मधुकर मोखरे यांसह सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.