राजूर येथे देशमुख कॉलेज मध्ये भयमुक्त वातावरणात १२वी ची परीक्षा सुरू.

अकोले/प्रतिनिधी
–
अकोले तालुक्यातील राजूर येथील अॅड.एम.एन.देशमुख कॉलेज केंद्र क्र. ०८०३ येथे अतिशय प्रसन्न व आनंददायी तसेच भयमुक्त वातावरणात एच.एस.सी.(१२वी) परीक्षा सुरू झाली आहे.
केंद्रात केंद्र प्रमुख दिपक बुऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परीक्षा सुरू झाली.परीक्षा केंद्रावर(०८०३ ) येथे सुरू झालेल्या परीक्षेसाठी आलेल्या सर्व विदयार्थ्यांचे प्राचार्य डॉ.भाऊसाहेब देशमुख,केंद्र संचालक प्रा.दिपक बुऱ्हाडे, उपकेंद्र संचालक शिवाजी बुरके,लिपिक रविंद्र कवडे,सहाय्यक परिरक्षक चंदन बडवे,प्रा.बाळासाहेब घिगे,प्रा.सचिन लगड,प्रा.एस.एम. महाडदेव, एस.जे. शेटे आदिंनी गुलाबपुष्प देऊन परीक्षार्थी विदयार्थांचे स्वागत केले.या केंद्रावर पहिल्या दिवशी इंग्रजी पेपरसाठी ४३७ विदयार्थी प्रविष्ट झाले.या केंद्रासाठी गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाचे प्रा.दिपक बुऱ्हाडे हे केंद्रसंचालक तसेच शेंडी विदयालयाचे प्रा. शिवाजी बुरके हे उपकेंद्र संचालक म्हणून काम पाहत आहे.
येथील केंद्रावर अॅड.एम.एन.देशमुख कॉलेज,सर्वोदय विद्या मंदिर,मा.मधुकरराव पिचड विदयालय,समर्थ कन्या विद्यालय राजूर,कळसुबाई विदयालय बारी, पिंपरकणे विद्यालय,शेंडी विद्यालय आदी विदयालयांतील विदयार्थी प्रविष्ट झाले आहेत.दरम्यान अकोले पंचायत समितीचे केंद्रप्रमुख स्वाती आडाणे यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले.
राजूर पोलीस स्टेशनचे पोलीस सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
परीक्षा यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व पर्यवेक्षक व कर्मचारी वृंद आदी चोख व्यवस्था ठेवत आहेत.