मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पारनेर तालुक्याच्या पाहणी दौऱ्यावर। – झावरे

दत्ता ठुबे
पारनेर/प्रतिनिधी :
पारनेर तालुक्याच्या अतिदुर्गम भागात वनकुटे व तास पळशी, व ढवळपुरी या भागात गेल्या दोन ते तीन दिवसापासून सारखा गारपीटी चा पाऊस पडत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी गारपीटग्रस्त भागाचा उद्या मंगळवारी (दि. ११ एप्रिल) पाहणी दौरा करणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. वनकुटे पळशी ढवळपुरी या भागामध्ये झालेल्या नुकसानीची माहिती दिली होती. मंत्री विखे यांनी तात्काळ या नुसकानग्रस्त घटनेची सविस्तर माहिती घेतली व मदतकार्य सुरू केले. त्यामुळे या भागाला प्राथमिक स्वरूपात तात्काळ मदत मिळाली आहे. या गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील उद्या मंगळवार दि. ११ एप्रिल रोजी येणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले आहे. अशी माहिती अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पारनेर तालुक्याचे नेते सुजितराव झावरे पाटील यांनी पत्रकारांना दिली आहे.
यावेळी बोलताना सूजित झावरे पाटील म्हणाले की या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सरसकट मिळाली पाहिजे त्या संदर्भात महसूलमंत्र्यांशी संपर्क केला होता त्यांनी तात्काळ यंत्रणा कार्यान्वित करून शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपात प्रशासनाच्या वतीने मदत कार्य सुरू केले आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती पिकाबरोबर अनेक घरांचे नुकसान झाले असून झाडे उन्मळून पडले आहेत. त्यामुळे या भागात आपत्तीग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे उद्या मुख्यमंत्री या भागाचा पाणी दौरा करणार आहे यावेळी शेतकऱ्यांच्या वतीने या भागातील समस्या मांडणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.