इतर

अॅड सुभाष लांडे आणि संजय नांगरे यांचा नागरी सत्कार


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी

 शेवगावचे भूमीपुत्र कॉ सुभाष पाटील लांडे हे विद्यार्थीदशेपासून डाव्या चळवळीत कार्यरत असून समजातील शेतकरी,कष्टकरी , श्रमजीवी अशा विविध घटकातील कष्टकरीवर्गावरील अन्यायाच्या विरोधात वेळोवेळी रस्त्यावर उतरून शासन व प्रशासनाच्या विरोधात वेळीवेळी संघर्षाची भूमिका घेवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम कॉ.लांडे यांनी केलेले आहे.
 अन्यायाच्या विरोधात निघालेल्या मोर्चात आपल्या मागे किती लोक आहेत. याचा विचार न करता रस्त्यात जे भेटतील त्यांना बरोबर घेवून वंचिताना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे. आता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्याचे सचिव म्हणून राज्यभर काम करण्याची संधी त्यांना मिळाली असून आपल्या कार्यातून ते पक्षालाही नवसंजीवनी प्राप्त करून देतील असा आत्मविश्वास जेष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ.राम बाहेती यांनी व्यक्त केला. कॉ.सुभाष लांडे यांची भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिवपदी तसेच कॉ.संजय नांगरे यांची राज्य कौन्सिलच्या सदस्यपदी निवड झाल्याने त्यांचा नागरी सत्कार शेवगाव येथे रविवारी पार पडला. कॉ.नामदेवराव चव्हाण, कॉ.बन्सी सातपुते, कॉ.कृष्णनाथ पवार, कॉ.बाबा आरगडे, कॉ.शशिकांत कुलकर्णी, सेवा निवृत्त प्राचार्य शिवाजीराव देवढे, किसनराव माने, कॉ.स्मिता पानसरे, कॉ.बेबीताई लांडे, कॉ.विना भस्मे, जिपच्या कृषी समितीचे माजी सभापती दिलीपराव लांडे, कॉ.बबनराव पवार, कारभारी गलांडे, संदीप इथापे, संजय डमाळ, राम लांडे, बबनराव लबडे, संगीता रायकर, अंजली भुजबळ, सुनीत्रा महाजन, एकनाथ कुसळकर, रावसाहेब जाधव, बाळासाहेब फटांगरे, प्रशांत भराट, भगवान गायकवाड, आदींसह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ, आशा  कर्मचारी संघटना, राज्य किसान सभा, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, ऑल इंडिया युथ फेडरेशन, शहीद भगतसिंग होकर्स युनियन, साई रिक्षा युंनियन आदी संस्था संघटना व विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. कॉ.बबनराव लबडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले तर अरविंद देशमुख यानई सूत्रसंचालन केले. गेल्या ४० वर्षाच्या कार्यकाळात पक्ष संघटनेच्या माध्यमातून समाजातील गोरगरीब, कष्टकरी, लोकांना न्याय मिळवून देण्याच्या निरपेक्ष कामातून तालुक्यात सुमारे ५० वर्षानंतर संघटनेच्या राज्य नेतृत्वाची संधी मिळाली असून या पुढील काळात सर्वांना बरोबर घेवून अधिक जोमाने काम करण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याची ग्वाही कॉ.लांडे यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button