गायरान व वन जमिनींवरील अतिक्रमण कायम करा , श्रीगोंदा तहसील वर बोंबाबोंब मोर्चा

अंकुश तुपे
श्रीगोंदा प्रतिनिधी
दि.१४: -पारधी, भिल्ल, भटके आदिवासी व दलित समाजाच्या वतीने सोमवार दि.१४ रोजी श्रीगोंदा तहसील कार्यालयावर भव्य ढोल-ताशा व बोंबाबोंब मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व आदिवासी पारधी संघटनेने जिल्हाध्यक्ष अजित भोसले यांनी केले. यावेळी आदिवासींनी जीव गेला तरी चालेल पण श्रीगोंदा तालुक्यातील गायरान अतिक्रमणे काढू देणार नाही असा इशारा दिला . यावेळी तहसिलदार मिलिंद कुलथे यांनी निवेदन स्विकारले.
निवेदनात श्रीगोंदा तालुक्यातील आदिवासी, भटके विमुक्त व दलित समाजातील कुटुंबांनी शासकीय गायरान व वन जमिनींवर निवासी व वहितीसाठी केलेले अतिक्रमण नियमानुकुल करुन ७/१२ वर नावांची नोंद करावी. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या नोटीस व अतिक्रमण हटविण्यापुर्वी मा. मुंबई उच्च न्यायालय ६ ऑक्टोबर २०२२ च्या शासन निर्णयाचा अतिक्रमण धारकांनी मा. उच्च न्यायालय मुंबई येथे रिव्हीव्यु पिटीशन पुनर्निरीक्षण अर्ज दाखल करावे. निवासी प्रयोजनाच्या अतिक्रमण धारकांना आलेल्या नोटीसीच्या आधारे किंवा नोटीस येण्यापुर्वी हायकोर्ट निवासी जागेवरील व वहिती केलेल्या अतिक्रमण धारकांच्या वतीने रिट याचिका शासनाने दाखल करावी. मा. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाआगोदर शासनाने वेळोवेळी जमिन नावे करण्याबाबतचे परिपत्रकांची तातडीने अंमलबजावणी करावी. श्रीगोंदा तालुक्यातील आदिवासी भटके विमुक्त व दलित समजाने वन जमीनी व गायन जमिनींवर केलेले अतिक्रमण सन १९७० ते १९९० आगोदर
केलेले नियमाकुल करण्यात यावीत. या प्रमुख मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या. व जीव गेला तरी चालेल पण अतिक्रमणे काढू देणार नाही असा प्रशासनाला इशारा दिला.
या मोर्चाला पाठींबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, उपाध्यक्ष बाबासाहेब भोस, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे, आदिवासी पारधी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र काळे, सुनील ओहोळ, राहुल भोसले, भाऊ पवार, अशोक मोरे, विजय काळे, रवींद्र भोसले, स्वप्निल पवार, रामसिंग भोसले, नवनाथ भोसले, आसाराम काळे, विलास काळे, नितीन भोसले व मोठ्या संख्येने आदिवासी महिला व नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.