इतर

रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे “स्वप्नातला एक दिवस”.

नाशिक-

      जनता विद्यालय, पवन नगर, सिडको, नाशिक या शाळेतील ४० विद्यार्थी व ४० विद्यार्थिनींना रोटरी क्लब ऑफ नाशिक तर्फे एक स्वप्नवत सफर आज दिवसभर घडविण्यात आली.

      त्र्यंबक रोड वरील हॉटेल BLVD यांच्या सौजन्याने सकाळच्या नाष्ट्यापासून सुरू झालेला दिवस संध्याकाळी ५ वाजता कुकीज व स्नॅक्स ने संपला.

     सर्वप्रथम हॉटेल कसे चालते याचे प्रात्यक्षिक दाखविले गेले. त्यानंतर विस्डम हाय च्या विद्यार्थ्यांनी एक तासभर कार्यक्रम सादर केला. त्यानंतर प्रसिद्ध भारतीय प्रशासन अधिकारी व दूरदर्शन वरील वृत्त निवेदिका सौ ज्योती आंबेकर यांनी संवाद साधला.

       जेवणानंतर लगेच रोटे सागर भडाणे यांनी जीवन आनंदी कसे जगावे याचे मार्गर्शन केले व नंतर रोटे डॉ हितेश बुरड यांनी फारच दिलखुलास व एकदम वेगळ्या तऱ्हेने दातांची निगा राखण्यासाठी काय करावे हे समजावून सांगितले. 

       सर्वात शेवटी काही विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत प्रगट केले व या स्वप्नातून सत्यात येऊन मुले परत आपल्या शाळेकडे रवाना झाली. 

      रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या या उपक्रमाचे हे सातवे वर्ष आहे. क्लबचे अध्यक्ष रोटे मंगेश अपशंकर यांनी कार्यक्रमाची सुरुवात केली व क्लबचे सचिव रोटे डॉ गौरव सामनेरकर यांच्या आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button