ग्रामीणमहाराष्ट्र

मराठी भाषा संवर्धनासाठी शब्दगंध परिषदेचे महत्वाचे योगदान – प्रा.डॉ.शंकर चव्हाण


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
मराठी भाष्येच्या संवर्धनासाठी सर्वच स्थरातून प्रयत्न करण्यात येत असुन शब्दगंध चे त्यामध्ये महत्वपूर्ण योगदान राहिलेले आहे,नवोदितांना मराठी भाषेची गोडी लागावी आणि त्यांच्या हातुन नवनिर्मिती व्हावी असे उपक्रम सातत्याने राबवित असल्यानेच शब्दगंध च्या कार्याचा विस्तार होत आहे.* असे मत जेष्ठ साहित्यिक प्रा.डॉ.शंकर चव्हाण यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य च्या वतीने प्राचार्य चंद्रकांत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्ताने आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यसंमेलन प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, कोरोना काळात भावना व्यक्त करण्यासाठी आशा काव्य संमेलनाने नवोदितांना संधी मिळत आहे.
शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी प्रास्ताविक करतांना म्हणाले कि, अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रसिद्ध करण्यात येणार असुन लवकरच कॉ.गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार निवड समितीची बैठक घेण्यात येत आहे,
कवी सुभाष सोनवणे म्हणाले कि,भाषा संवर्धन होण्यासाठी सर्व व्यवहार मराठीतून व्हायला हवेत,
प्राचार्य चंद्रकांत भोसले अध्यक्षपदावरून बोलतांना म्हणाले कि, शब्दगंध चा हा अतिशय स्तुत्य उपक्रम असुन सातत्याने काव्य संमेलन व्हायला पाहिजेत,त्यामुळे लिहिणा-र्यांना चांगली संधी मिळते.
शाहिर भारत गाडेकर यांनी वंदन माणसाला हे वामनदादा कर्डक यांचे गीत सादर करून काव्य संमेलनाचे उद्घाटन केले,
यावेळी झालेल्या काव्य संमेलनामध्ये शेवंगाव चे आत्माराम शेवाळे,विद्या भडके,पुनम राऊत,संगीता दारकुंडे,पाथर्डी चे प्रा.डॉ.अशोक कानडे,शाहिर भारत गाडेकर,पारनेर चे ओमप्रकाश देडगे,श्रीरामपूर च्या प्राचार्या डॉ.गुंफा कोकाटे,संगीता फसाटे,कोपरगाव चे राम गायकवाड, प्रमोद येवले,डॉ.सुनीता गाडेकर,प्र्रशांत वाघ,वृंदा गंभीरे,सोलापूर,ऋता ठाकुर, सुनीलकुमार धस,विक्रम शिंदे,गेवराई च्या प्रिती टेकाळे,अकोले च्या स्वाती गिरी,सोमनाथ येखंडे,लक्ष्मण सोनवणे, कोल्हापूर चे सिद्धेश पाटील,नामदेव राठोड, औरंगाबाद चे एच आर लहारे,भास्कर लगड,विजय पवार,स्वाती काळे,किरण सोनार,शर्मिला गोसावी यांच्यासह पुणे,नाशिक,कोल्हापूर, औरंगाबाद, बीड,अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यातील कवी सहभागी झाले होते,
शेवटी राजेंद्र फंड यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष राजेंद्र उदागे,भगवान राऊत,मेट्रो न्युज चे मकरंद घोडके, वैभव घोडके,दिशा गोसावी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button