वाचनाने जीवन, वाचा, आणि विचार समृद्ध होतात – सोमनाथ राठी

संगमनेर – संगमनेर साहित्य परिषदेने मराठी भाषा गौरव दिन आणि कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून प्रसिद्ध व्याख्याते सोमनाथ राठी यांचे व्याख्यान हॉटेल शिवसागर हॉल , संगमनेर येथे आयोजित केले होते. कार्यक्रमाची सुरुवात सुरेश परदेशी यांनी स्वागत गीताने केले. प्रमुख व्याख्यात्यांचा परिचय ज्ञानेश्वर गोंटे
यांनी केला . प्रास्ताविक संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार महेश गोडसे यांचे हस्ते करण्यात आला. या निमित्त संगमनेर साहित्य परिषदेचे पसायदान वाचनालय आणि वाचन मंडळाचे उदघाटन प्रमुख पाहुणे आणि व्याख्याते सोमनाथ राठी यांच्या हस्ते करण्यात आले.

” माणसाने चिंतातूर न होता चिंतामुक्त जीवन जगावे . पुस्तकानेच माणसाच्या जीवनात परिवर्तन होते. वाचनाने मनुष्याचे जीवन, वाचा आणि विचार समृद्ध होते. आपण काय वाचावे आणि काय वाचू नये याची निवड करणे वाचकाने ठरविले पाहिजे. वाचनासाठी प्राध्यान्य क्रमाने किमान चार विषय निवडावे म्हणजे वाचनाला फोकस करता येते. सकारात्मक विषयातून जीवन फुलविण्याचे काम पुस्तके करतात. आपले कर्तृत्व, जीवन आणि व्यक्तिमत्व ज्या पुस्तकाने विकसीत होते अशीच पुस्तके शक्यतो वाचण्यासाठी निवडावीत. आपण वाचलेल्या पुस्तकाने आपल्याला काय दिले याचेही अवलोकन करावे. आपण वाचलेल्या पुस्तकातील ज्ञानाचा खजिना दुसऱ्यांकरिता खुला करावा, संवाद साधावा. ग्रंथ हे गुरु आहेत, शब्दांमध्ये सामर्थ्य आहे, त्याचे आकलन करणे आणि आचरण करणे वाचकांकडून अभिप्रेत आहे. आमचा डीएनए हा मराठी भाषेशी निगडीत आहे. ” असे उद्गार सोमनाथ राठी यांनी काढले.
याप्रसंगी सोमनाथ राठी यांनीआपल्या संग्रहातील निवडक अकरा पुस्तकांची ग्रंथ भेट पसायदान वाचनालयास दिली. हिरालाल पगडालसर यांनी महत्त्वपूर्ण विषयावरील तीन पुस्तके पसायदान वाचनालयास भेट दिली.
यावेळी वाचन मंडळाचे प्रमुख मुकुंद डांगे, शशांक गंधे, ग्रंथालय प्रमुख शेख इद्रिस , ज्ञानेश्वर राक्षे , गिरीश सोमाणी, सुरेश परदेशी यांचा सत्कार करण्यात आला.
उपस्थितांचे आभार गिरीश सोमाणी यांनी मानले.कार्यक्रमाची सांगता बाळकृष्ण महाजन यांनी सादर केलेल्या पसायदानाने झाली.
या सुंदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुकुंद डांगे यांनी केले. यावेळी संगमनेर साहित्य परिषदेचे पदाधिकारी व सदस्य , लक्ष्मण ढोले , निलेश पर्बत, दर्शन जोशी, नंदकिशोर बेल्हेकर , डॉ.जी.पी.शेख, विकास खेडकर , अनघा खेडकर , अनिल सोमणी , रामनाथ सातपुते, संदीप सातपुते, दीपक टाक , नितीन वाकचौरे, सुरेंद्र गुजराथी , श्वेता सराफ , सय्यद असिफ अली , कारभारी देव्हारे, शोभा काळे, शोभा बाप्ते , सविता गाडेकर, सविता गोडसे , डॉ. सुधाकर पेटकर ,अमोल गवांदे , सुप्रिया गवांदे , अलका पेटकर, अनुराधा आहेर, अंकुश आहेर, जिजाबा हासे , पांडुरंग घोडेकर , ललित देसाई, सौ. सुवर्णा साकी, सौ. स्मिता सोमाणी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थीत होते.