रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी वसंतराव उघडे यांची निवड !

अकोले प्रतिनिधी
पिंपळगाव निपाणी येथील सामाजिक कार्यकर्ते वसंतराव उघडे यांची रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे . अकोले येथे शासकीय विश्राम गृह येथे रिपब्लिकन पक्षाची बैठक जेष्ट नेते सावळेराम गायकवाड यांचे अध्यक्षतेखाली पार पडली .
सदर बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ही निवड करण्यात आली . उघडे हे रिपब्लिकन पक्षाचे 15 वर्ष अकोले तालुक्याचे सरचिटणीस म्हणून राहिले आहे . आपल्या पदाच्या माध्यमातून अनेकांना त्यांनी न्याय दिलेला आहे . त्यांचा दिलखुलास स्वभाव व मिश्कील टिपण्णी मुळे ते नेहमीच चर्चेत राहिलेले आहेत . पिंपळगाव निपाणी येथे, ग्रामपंचायत, सोसायटी व विविध संस्थेचे त्यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे , आपल्या कामाचा ठसा कायमच उमटवलेला आहे . साधी राहणी उच्च विचार या तत्त्वामुळे त्त्यांचे अकोले तालुक्यात मोठे चाहते आहेत . त्याचे चाहते व कार्यकर्त्यांच्या आग्रहाने त्यांना जिल्हा स्तरावर काम करण्याची संधी मिळाली आहे . महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणूनच त्यांची ओळख आहे . या निवडीबाबत जिल्हाप्रमुख सुरेंद्र थोरात यांनी तात्काळ होकार कळवला आहे . त्यांच्या भावी कार्यासाठी दुरध्वनीद्वारे शुभेच्छा देखील दिल्या आहेत . त्याच प्रमाणे कारवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते, प्रदीप आढाव यांची देखील जिल्हा संघटक पदी फेर निवड करण्यात आली आहे . मुख्यमंत्री पुरस्काराने सन्मानित असलेले दिवंगत संतुजी आढाव यांचे ते चिरंजीव आहेत . वडिलांच्या पासुनच त्यांना समाजसेवेचे बाळकडू मिळालेले आहे त्या मुळे त्यांचे देखील सर्व स्तरातून स्वागत होत आहे . तसेच दिलीप गायकवाड यांची जिल्हा संघटक पदी तर डोंगरगाव चे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब क्षीरसागर यांची अकोले तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे . रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना रामदास आठवले हे पाच मार्च रोजी अकोले तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत . त्या दृष्टीने पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली होती . दौऱ्याच्या अनुशंगाने जबाबदाऱ्या देखील निश्चित करण्यात आल्या आहेत . सदर बैठकीला प्रदेश उपाध्यक्ष विजयराव वाकचौरे यांनी संबोधित केले . केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे पँथर पासून ते आजपर्यंत समाजाच्या सुखदुःखात आहेत . पाच मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता अकोले येथे शासकीय विश्राम गृह येथे पत्रकार परिषद तर सायंकाळी सहा वाजता कोतुळ येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पदस्पर्श झालेल्या भूमीची विकासात्मक दृष्टीने पाहणी करून आदिवासी आश्रम शाळेच्या भव्य इमारतीचे उद्घाटन करणार आहेत . कार्यक्रम आटोपून संगमनेर येथे सामाजिक सलोखा परिषद आयोजित केली आहे . त्या परिषदेला संबोधित करणार असल्याचे वाकचौरे यांनी सांगितले . संगमनेर येथे प्रसिद्ध गायिका कडुबाई खरात यांचा गायनाचा, भीम गीतांचा कार्यक्रम होणार असल्याने कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे अवाहन करण्यात आले . शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देखील बैठकीत चर्चा करण्यात आली . शिर्डीत पक्षाला प्रतिनिधित्व हवे आहे . त्या साठी मित्र पक्षाकडे आग्रही भूमिका मंडण्याबदबद एक मत झाले . झालेल्या निवडीचे जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव, बाळासाहेब गायकवाड, विभागीय प्रमुख भीमा बागुल, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, दीपक गायकवाड आदिनी अभिनंदन केले आहे . या बैठकीला तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे , युवा नेते किशोर शिंदे, बाळासाहेब वैराट, राहुल चिकने, रमेश वाकचौरे, पाष्टर गिदोन, मिलिंद जगताप, प्रवीण देठे, राजेंद्र आव्हाड, राजू सोनवणे, विलास मनोहर, आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.