अकोले तालुक्यातील 14 शाळांना रोटरी क्लब कडून ग्रंथालयासाठी कपाटे वाटप !

प्रत्येक विद्यार्थी पुस्तक कसे वाचतील ते पहावे. व त्यांच्यातील बदलाचा अहवाल द्यावा.
प्रत्येक विषय शिकविण्यासाठी शिक्षक नसतात ही समस्या सोडविण्यासाठी रोटरी ने ई लर्निंग सॉफ्टवेअर शाळांना देत आहे. ते दृश्य स्वरूपात असल्याने त्याची दखल
राज्याच्या शिक्षण विभागाने घेतली असून त्यावर संशोधन चालू आहे.

रोटरी क्लब चे सदस्य स्वतःच्या खिशात हात घालून समाजासाठी मोठे योगदान देत आहे.स्वार्थ विरहित सेवा देत आहे. रोटरी फौंडेशन ट्रस्ट मार्फत अनेक उपक्रम राबविले जात आहे. रोटरीयन्स मोठ्या मनाने, विश्वासाने काम करित असून या उपक्रमात आपलेही हात त्यांना लागू द्यावे असेल आवाहन स्वाती हेरकळ यांनी केले.
यावेळी असिस्टंट गव्हर्नर दिपक मणियार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
रोटरी जीवन गौरव पुरुस्कार्थी व राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्कार्थी यांना सन्मानचिन्ह, मान पत्र, शाल, पुस्तक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन भाऊसाहेब कासार यांनी केले.
तसेच तालुक्यातील 14 जि. प. प्रा. शाळांना ग्रंथालयासाठी कपाटे वाटप करण्यात आली.
यावेळी नवीन सदस्य माजी उप प्राचार्य डॉ. संजय ताकटे यांना रोटरी पिन मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.

स्वागत रोटरी क्लब अकोले चे संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य यांनी केले. रोटरी स्थापनपासून चा केलेल्या कामाचा अहवाल अध्यक्ष सुनील नवले यांनी प्रस्ताविकातून सांगितला.
सन 2023-24 मध्ये रोटरी क्लब अकोले सेंट्रल ने राबविलेले उपक्रमाची माहिती सेक्रेटरी विद्याचंद्र सातपुते यांनी दिली.
सूत्रसंचालन उपक्रमशील शिक्षक भाऊसाहेब कासार यांनी केले. आभार सेक्रेटरी विद्याचंद्र सातपुते यांनी मानले.
चौकट 1)- रोटरीने जगातील पोलिओ निर्मूलनची शपथ घेतली होती पोलिओ ची लस संपूर्ण जगाला देऊन आपले उद्दिष्टे पूर्ण केले आहे. फक्त जगात पाकिस्तान व अफगणिस्तान या दोन देशात प्रत्येकी दोन या प्रमाणे चार पोलिओ रुग्ण राहीलेले आहेत.
– स्वाती हेरकळ,डिस्ट्रिक्ट गव्हर्नर
चौकट – रोटरी जीवन गौरव पुरस्कार्थी
रामदास गणपत मालुंजकर( रुंभोडी ),दशरथ कोंडाजी एखंडे (टाहाकारी ) विलास पंढरीनाथ शेळके ( देवठाण ) वै. नामदेव पांडुरंग वाकचौरे ( विठे ) यांना सन्मानित करण्यात आले.
चौकट – राष्ट्र बांधणीचे शिल्पकार पुरस्कार्थी – जि. प. प्रा. शिक्षक
संजय धोंडिबा गोर्डे,( पाचपट्टा) मीना रामजी जाधव ( नाचणठाव) नंदा रेवजी कातोरे ( बांबळेवाडी ) नामदेव किसन सोंगाळ ( निंब्रळ ) यांना सन्मानित करण्यात आले.