अकोल्यात कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांना क्षमता वृद्धी प्रशिक्षणाचा चौथ्या टप्प्याचे उद्घाटन.!

अध्यापनात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणे गरजेचे- सुनील घोलप
अकोले /प्रतिनिधी-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये कृती संशोधन व नवोपक्रम आपल्या अध्यापनात नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र वापरले तरच विद्यार्थी केंद्रित शिक्षण आपण देऊ शकतो असे प्रतिपादन पंचायत समिती अकोले शिक्षण विभागाचे विषय तज्ञ सुनील घोलप यांनी केले.
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे,जिल्हा शिक्षण व संशोधन परिषद संगमनेर व पंचायत समिती अकोले यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण अकोले येथे चौथ्या टप्प्यात उच्चमाध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक यांना अभिनव शिक्षण संस्था अकोले येथे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अभिनव शिक्षण संस्थेच्या प्राचार्य अल्फोंजा या होत्या.या विविध टप्प्यांमध्ये माध्यमिक विभागाचे ५०० शिक्षकांना तीन टप्प्यात प्रशिक्षण दिले गेले व पुढील दोन टप्प्यात उच्चमाध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्र, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वैशिष्ट्ये, अभ्यासक्रम आराखडा,कृती संशोधन व नवोपक्रम, तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अध्यापनात उपयोग अशा विविध विषयांवर शिक्षकांच्या क्षमता वृद्धीसाठी राज्य शासनाने हे प्रशिक्षण आयोजित केले आहे.या प्रशिक्षणात दरम्यान पंचायत समिती शिक्षण विभागातील विषय तज्ञ सुनील घोलप, श्री. पठाडे, महेश पाडेकर, भारत जगधनी, हरीश आंबरे, सुयोग वाकचौरे, प्रशांत जाधव, मंगल आरोटे, सुहास भावसार, सुनील लांघी, सचिन वाकचौरे, राजेंद्र भोर, बळीराम फरगडे, मुकुंद सूर्यवंशी आदी सुलभकांच्या साह्याने तीन दिवशीय चौथे प्रशिक्षणाची सुरुवात झाली आहे
यावेळी अकोले तालुक्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी शिक्षक उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश पाडेकर, प्रास्ताविक भारत जगधनी तर आभार हरीश आंबरे यांनी मांडले.