आदिवासी तरुणाचा मृत्यु : चौकशीसाठी घोटी येथे उपोषण

अकोले/प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील आदिवासी दुर्गम भागातील घोटी येथील तरुण दत्तात्रय सोमनाथ कौटे (वय वर्षे २४) यांच्या मृत्यूची चौकशी सीआयडी मार्फत करावी त्याच्या मृत्यूस जबाबदार दोषीविरूद्ध कारवाई करण्यासाठी कौटे कुटुंबीय व ग्रामस्थ सहा दिवसांपासून साखळी उपोषण करीत आहेत.गुरुवारी (१० जुलै) त्यांच्या उपोषणाचा सहावा दिवस होता.घोटी येथील दत्तात्रय सोमनाथ कौटे याचा (योगवाडी) ता.तासगाव सांगली येथील एका कुक्कुटपालन केंद्र व्यावसायिकांकडुन खून झाल्याचा आरोप कौटे कुटुंबाने केला आहे
.मात्र त्याचा अचानकपणे मृत्यु झाल्याचे त्याच्या घरी समजले. याबाबत तासगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, याबाबत कोणतीही हालचाल होताना दिसत नाही.संशयित दोषींना पोलिस पाठीशी घालत आहेत.तासगाव पोलिस आरोपीस संरक्षण देऊन चौकशीत पक्षपातीपणा करीत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मुख्य आरोपीसह चौकशी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
गावात ग्रामसभा घेऊन त्याचे निवेदन पोलिस ठाणे,मंत्रालय, जिल्हाधिकारी स्तरावर देण्यात आले.मात्र घटना समजताच राजुर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे,त्याच्यासोबत महाराष्ट्र सैनिक ज्ञानेश्वर लेंडे,सिकंदर पोपेरे,उपोषण स्थळी जाऊन त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी प्रशासनाला केली.
यावेळी उपस्थित सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक सरोदे,महाराष्ट्र सैनिक ज्ञानेश्वर लेंडे,सिकंदर पोपेरे,गावातील सर्व ग्रामस्थ तरुण वर्ग उपस्थित होते.