संगमनेर साहित्य परिषदेने केला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान !

संगमनेर – संगमनेर साहित्य परिषदेने आज परिषदेच्या सदस्य असलेल्या महिला आणि काही कर्तृत्ववान महिलांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान केला. यावेळी संगमनेर साहित्य परिषदेच्या काही निवडक महिला सदस्यांच्या घरी परिषदेचे पदाधिकारी पोहोचले. सन्माना प्रित्यर्थ काही भेट वस्तू देत त्यांचा यथोचीत सन्मान करण्यात आला.
अपंग महिला मंदा संपत अभंग या महिलेचा सन्मान करताना या महिलेच्या चेहऱ्यावर उमटलेले भाव खूप अनमोल होते. बाहेरच्या जगाशी फारसा संपर्क नसल्याने आणि अपंग असल्याने बाहेरही पडता येत नसल्याने अश्या महिलेचा त्यांच्या घरी जाऊन केला सन्मान हा उचित होता. त्याचबरोबर संगमनेर नगरपालिकामध्ये असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र यामधील परिचारिकांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

त्यांनी पोलिओ लसीकरण मोहीम आजही उत्साहाने चालू ठेवली याबद्दल परिषदेने त्यांचे विशेष कौतुक केले. या निमित्त पुष्पा सचिन गायकवाड , प्राचार्य , स्वामी विवेकानंद इंग्लिश मेडियम स्कूल यांनी परिषदेचे सभासदत्व स्वीकारले. परिषदेने हा आगळा वेगळा उपक्रम राबविताना महिलांच्या घरी जाऊन समक्ष केलेला सन्मान सदस्य महिला आणि कर्तृत्वान महिलांना भावला आणि त्यांनी धन्यवादही दिले
संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर , उपाध्यक्ष लक्ष्मण ढोले , सचिव ज्ञानेश्वर राक्षे , सह संघटक महेश गोडसे, सह सचिव बाळकृष्ण महाजन, ग्रंथालय प्रमुख शेख इद्रिस यांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यास परिश्रम घेतले.
