अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई साठी नेवासा तहसील कार्यालयाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा!

जीवन ज्योत फाऊंडेशन चे अनोखे आंदोलन
नेवासा प्रतिनिधी।
मागील वर्षी अतिवृष्टीने नेवासा तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे कपाशी, तूर, बाजरी, मका व फळबाग या पिकांचे नुकसान झाले होते. सदर पिकांचे मागील वर्षी पंचनामे देखील करण्यात आले होते. अगोदरच पाऊस पडत नसल्याने खचून गेलेला बळीराजा पिकाप्रमाणे अर्धमेला झाला आहे. त्यात उशिरा का होईना बळीराज्याच्या आर्त हाकेला प्रतिसाद देत परिसरातील शेतकरी वर्गावर शासनाची कृपा झाली.
अतिवृष्टीने बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे राज्य शासनाने जाहीर केले होते.मागील २०२२ वर्षी अतिवृष्टीच्या तडाख्यात सापडलेल्या पिकाची भरपाई मंजूर होऊन यादीमध्ये नावेही आली. मात्र, ही नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही.

त्यामुळे शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे.ही नुकसान भरपाई मिळणार तरी कधी, असा सवाल आंदोलनकर्त्यांनी कडून केला जात आहे.नुकसान भरपाई त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, यासाठी तहसील कार्यालयात जीवन ज्योत फाऊंडेशन च्या वतीने अर्धनग्न बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनाची तहसील कार्यालय कडून कुठलही दखल न घेतल्या मुळे जीवन ज्योत फाऊंडेशन च्या वतीने तहसील कार्यालयाची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.
शेतकरी विरुद्ध तहसील विभाग असा युद्ध सुरू झाले आहे. जर नुकसान भरपाई लवकर जमा झाली नाही तर तहसील विभागाला टाळे ठोकू. असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला
या वेळी जीवन ज्योत फाऊंडेशन चे कमलेश नवले पाटील,छत्रपती युवा सेनेचे नरेंद्र नवथर,सत्यमेव जयते प्रतिष्ठान चे जैद शेख,अक्षय बोधक,आप्पासाहेब आरगडे,ओम आरगडे,सुधीर आरगडे,गणेश चौघुले,अमोल जोगदंड, महेश नवले,तोफीक शेख,विजय खरात,प्रदिप आरगडे,रोहित रुईकर,बडू आरगडे,अॅड.पाडूरंग औताडे,गौरव नवघरे,शेतकरी संघटनेचे ञिबंक भदगले,संजय ठुबे,प्रदिप जाधव,निलेश आरगडे,बाबासाहेब चामुटे,सादिक शेख, सुफियान सय्यद,विराज वाल्हेकर,प्रमोद निकम,महेश बोरुडे,अफरोज शेख,चंद्रकांत आरगडे,नितीन आरगडे,दिपक नवले,राम गरड,सुनिल गव्हाणे,अक्षय आरगडे,अभिजीत बोधक,संभाजी आरगडे,पांडूरंग आरगडे,लखन गरड,सागर कदम,सिद्धांत आरगडे,बन्सी भिगारे,निलेश कडू यांच्यासह अनेक शेतकरी व सहकारी उपस्थित होते.