जिल्ह्यातील आदिवासी मुलांनी पोलीस सैन्यदल भर्तीपूर्व प्रशिक्षणासाठी अर्ज करा

विलास तुपे
राजूर : राजूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया मार्फत जिल्हयातील अनुसूचित जमातीच्या मुलांसाठी मोफत पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजन करण्यात आले आहे.
राजूर प्रकल्प कार्यालयांतर्गत कार्यरत असलेल्या अकोले तालुक्यातील मवेशी येथे चार महिन्यांचे मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले आहे . जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन राजूर प्रकल्पाचे ,प्रकल्प अधिकारी राजन पाटील यांनी केले आहे
यासाठी आवश्यक पात्रता व कागदपत्रे पुढीप्रमाणे
इ.१२ वी उत्तीर्ण गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, रहिवाशी दाखला किंवा रेशन कार्ड, डोमीसाईल दाखला, चार पासपोर्ट साईज फोटो. तर शारीरिक पात्रता : वजन किमान ५० किलो असावे , वय १८ ते २५ वर्ष तर उंची कमीत कमी १६५ सें.मी. असावी. प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी दिनांक २५/०३/२०२४ पर्यंतच उमेदवारांचे ऑफलाईन अर्ज पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता. अकोले येथे स्वीकारले जातील.२६/०३/२०२४ रोजी सदर परीक्षेसाठी पोलिस तथा सैन्यदल भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र मवेशी, ता.अकोले, जि.अहमदनगर येथे सकाळी ठिक १०.०० वाजता मुळ व झेरॉक्स कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
निवड पध्दत पुढीप्रमाणे –
शारीरिक क्षमता चाचणी – ८०० मिटर रनींग (गुण-५०), लेखी परीक्षा( गुण ५०) एकूण १०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांची निवड मेरीटनुसार करण्यात येईल असे म्हटले आहे