रतनवाडीत विद्यापीठस्तरीय नदी स्वच्छता व परिक्रमा शिबिर संपन्न

पुणे, अहमदनगर , नाशिक या जिल्हयातून २६० विद्यार्थ्यांचा सहभाग
विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना आणि डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे, डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी तसेच डाॕ. डी. वाय. पाटील विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय, आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे रतनवाडी,कळसूबाई-हरिश्चंद्रगड-अभयारण्य येथे विद्यापीठस्तरीय प्रवरा नदी उगम ते अमृतेश्वर मंदीर, भंडारदरा परिसर स्वच्छता व नदी परिक्रमा शिबिर आणि विद्यापीठस्तरीय पंचप्रण व ऐतिहासिक वारसा जतन व जंगल वाचन शिबिर पार पडले.

या शिबिराचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा. डॉ. पी. डी. पाटील , उपाध्यक्ष मा. डाॕ. भाग्यश्रीताई पाटील, सचिव मा. डॉ. सोमनाथ पाटील, डाॕ. रोहिणी पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ संचालक डाॕ. अभिजित कुलकर्णी आणि प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व प्राचार्य डाॕ. मोहन वामन हे 2015 पासून कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील रतनवाडी या गावात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत हे शिबिर घेत आहे या शिबिरात पुणे, अहमदनगर आणि नाशिक या तीन जिल्हयातून २६० विद्यार्थ्यांनी व १२ प्राध्यापकांनी सहभाग नोंदवीला. या शिबिरात सर्व विद्यार्थ्यांना रतनगड ट्रेकिंग तसेच रतनगडावर या जंगलातून गडावर जाणाऱ्या मार्गाची स्वच्छता करण्यात आली. तसेच प्रवरा नदीची स्वच्छता आणि आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाची लांब असलेल्या सांदन दरीचीही स्वच्छाता या शिबिराच्या माध्यमातूध करण्यात आली. शिबिरार्थींसाठी विविध विषयावर तज्ज्ञ मान्यवरांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी शिबिराच्या उदघाटन प्रसंगी एकलहरे गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अन्सारभाई जाहगीरदार, जेष्ठ पत्रकार लाल मोहम्मद जाहगीरदार, माजी चेरमन नूर मोहम्मद जाहगीरदार, तसेच अंनिसभाई जाहगीरदार, एसटी महामंडळाचे सचिन वाघचौरे, रतनवाडीचे माजी सरपंच पांढरे पाटील हे उपस्थित होते.
या प्रसंगी अन्सारभाई जाहगीरदार यांनी विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी अशी शिबिरे फार महत्वाची असतात असे मत मांडले तर सचिन वाघचौरे व पांढरे पाटील यांनी त्या भागातील प्रवरा नदी, भंडारदरा परिसर आणि अमृतेश्वर मंदिर यांचा भौगोलिक आणि सांस्कृतिक इतिहास सांगितला. तर लाल मोहम्मद यांनी आपल्या मनोगतातून शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या.
शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पतंजली योग अभ्यासक प्रा. विजय देशमुख, फळबाग तज्ज्ञ प्रा. प्रकाश गोडगे, संगमनेर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डाॕ. बाळासाहेब वाघ, रतनवाडी गावच्या सरपंच सौ. धनश्री झडे हे उपस्थित होते. याप्रसंगी प्रास्ताविक करताना प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी या भागात शिबिर घेत असताना आलेल्या अडी-अडचणीवर मात करून केलेल्या यशस्वी वाटचालीचा आढावा घेतला. गावच्या सरपंच सौ. धनश्री झडे यांनी मार्गदर्शन करताना आपल्या गावात होत असलेल्या शिबिराविषयी आनंद व्यक्त केला. डाॕ. मिनल भोसले यांनी या शिबिराचा आणि या अगोदर महाविद्यालयाने या भागात घेतलेल्या शिबिरांचा लेखाजोखा मांडला. उपप्राचार्य डाॕ. बाळासाहेब वाघ यांनी विद्यार्थ्यांवर सामाजिक बांधिलकी जपण्याचे संस्कार अशी शिबिरे करतात असे मत व्यक्त केले. प्रा. प्रकाश गोडगे यांनी सध्याच्या राजकारणाचा आणि प्रशासनाचा विचार केला तर अशा शिबिराच्या माध्यमातून घडणारे विद्यार्थी हे राजकारणात आणि प्रशासनात आले पाहिजे असे मत मांडले. प्रा. विजय देशमुख यांनी भारताची संस्कृती आणि परंपरा इतर देशाच्या संस्कृती आणि परंपरेच्या तुलनेत कशा श्रेष्ठ आहेत आणि त्या जपण्यासाठी विद्यार्थ्यांनी कसे प्रयत्न करावे या विषयी मार्गदर्शन केले. या नंतर विद्यार्थी विकास अधिकारी डाॕ. मुकेश तिवारी यांनी आभार मानले.
या शिबिराच्या नियोजनात विद्यार्थी विकास अधिकारी डाॕ. मुकेश तिवारी, डाॕ. मिनल भोसले, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. खालिद शेख, प्रा. रोहित वरवडकर, प्रा.ऋतुजा शिंदे, प्रा. मयुर मुरकुटे, प्रा. सतिश ठाकर, प्रा. आकाश शिर्के, प्रा. अभिषेक पोखरकर प्रा. राहुल थोरात, प्रा. शालिनी यादव, प्रा. अशोक धांबोरे, प्रा. पुजा निमगिरे श्री. गणेश कोळी श्री. जालिंदर जगदाळे यांनी सहभाग घेतला.
या शिबिरासाठी रतवाडी ग्रामस्थ तसेच श्री. नाथा झडे व दशरथ झडे यांचे सहकार्य लाभले.
