राशिभविष्य

आजचे पंचांग व राशिभविष्य दि.१४/०३/२०२४

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २४ शके १९४५
दिनांक :- १४/०३/२०२४,
वार :- बृहस्पतीवासरे(गुरुवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३८,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- शिशिरऋतु
मास :- फाल्गुन
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति २३:२७,
नक्षत्र :- भरणी समाप्ति १६:५६,
योग :- वैधृति समाप्ति २१:५९,
करण :- बव समाप्ति १२:२१,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- कुंभ(१२:३५नं. मीन) – पू.भा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- कुंभ,
राशिप्रवेश :- रवि – मीन १२:३५,
शुभाशुभ दिवस:- वैधृति योग वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०२:०८ ते ०३:३८ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०६:४० ते ०८:१० पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी १२:३८ ते ०२:०८ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०२:०८ ते ०३:३८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — संध्या. ०५:०८ ते ०६:३८ पर्यंत,

❀ दिन विशेष:
रवि मीन १२:३५, मु. १५ महर्घ, पुण्यकाल १२:३५ ते सूर्यास्त, घबाड २३:२७ नं., दग्ध २३:२७ नं., उमघंट १६:५६ नं.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २४ शके १९४५
दिनांक = १४/०३/२०२४
वार = बृहस्पतीवासरे(गुरुवार)

मेष
आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. सगळ्या कामात यश मिळाल्याने आपण खूप आनंदी व प्रसन्न व्हाल. आर्थिक लाभ सुद्धा होईल. मित्र व सगे सोयरे ह्यांच्या भेटीने घरातील वातावरण आनंदी होईल. उत्तम कपडे व भोजन प्राप्ती होईल.

वृषभ
आज सावध राहावे लागेल. आपले मन अनेक प्रकारच्या चिंतांनी व्यग्र असेल. स्वास्थ्यही जरा नरमच राहील. विशेषतः डोळ्यांचा त्रास संभवतो. स्नेही व कुटुंबीय ह्यांच्याशी मतभेद झाल्याने आपण दुःखी व्हाल. आपण सुरू केलेले काम अपूर्ण राहील. खर्च वाढेल. कष्टाचे योग्य फळ न मिळाल्याने मन निराश होईल. अविचाराने घेतलेल्या निर्णयाने गैरसमज निर्माण होतील.

मिथुन
आज विविध मार्गांनी लाभ झाल्यामुळे हर्षोल्हास वाढेल. पत्नी व संतती कडून फायदेशीर बातमी मिळेल. मित्रांशी संवाद साधल्याने आनंद मिळेल. विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळेल. सुग्रास भोजनाचा आस्वाद घेता येईल. सूर्याचे मीनेतील भ्रमण आपल्यासाठी लाभदायी होईल.

कर्क
आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टीने लाभदायक आहे. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. कामाच्या ठिकाणी आपले वर्चस्व वाढेल. बढतीची हमखास शक्यता आहे. कुटुंबात महत्वाच्या विषयावर चर्चा होईल. आईची तब्बेत उत्तम राहील. धन- संपत्ति, मान – सन्मानाची प्राप्ती होईल. घराच्या सजावटीत फेरबदल कराल. दिवसभराच्या कामामुळे थकवा जाणवेल. प्रकृती उत्तम राहील.

सिंह
आज मंगल कार्यात आपल्या स्नेहीजनांसह सहभागी व्हाल. कर्तव्यनिष्ठ राहून हाती घेतलेले काम तडीस नेण्याचा प्रयत्न कराल. सर्व व्यवहार न्यायानुसार असेल. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. व्यवसायात अडचणी येतील व वरिष्ठ नाराज झाल्याने तुम्हाला दुःख होण्याची शक्यता आहे. प्रकृती साधारण राहील. सूर्याचे मीनेतील भ्रमण हे आपल्या अष्टमातून होत आहे.

कन्या
आज वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील. आज आपला आवेश व क्रोध वाढणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. स्नेही व कुटुंबीयांशी जोराचे वाद झाल्याने आपण दुःखी व्हाल. शक्यतो प्रवास टाळा. हितशत्रूपासून सावध राहा. मीन संक्रांति पासूनचा एक महिना आपल्यासाठी काहीसा त्रासदायी होऊ शकतो. ह्या दरम्यान आपल्या विचारात अहंकारीपणा येऊ शकतो.

तूळ
आज आपले मन मित्रांसह खाणे – पिणे, फिरावयास जाणे तसेच प्रिय व्यक्तीच्या सहवासामुळे आनंदी राहील. एखादी सहल संभवते. मनोरंजनाची साधने व वस्त्रालंकार यांची खरेदी होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. मान – सन्मान संभवतात. सूर्य आता मीनेतून भ्रमण करेल. हा महिना आपल्यासाठी चांगला असेल. आणखी वाचा

वृश्चिक
आजचा दिवस सौख्यदायी आहे. कुटुंबीयांसह आनंदात वेळ घालवू शकाल. शारीरिक स्वास्थ्य व मानसिक प्रसन्नता अनुभवाल. नोकरीत सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळवू शकाल. स्त्रीयांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळेल. धनलाभ होईल. अपूर्ण कामे तडीस जातील. सूर्याचे मीनेतील भ्रमण आपल्यासाठी आव्हानात्मक होऊ शकते.

धनु
आज आपणास रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पोटाच्या तक्रारी वाढतील. कोणत्याही कामात यश न मिळाल्याने निराशा येण्याची शक्यता आहे. वाड्मय किंवा अन्य सृजनशील कलेप्रती आस्था राहील. संतती विषयक चिंता राहिल्याने मन बेचैन होईल. शक्यतो आज प्रवास टाळावा.

मकर
आज आपणास प्रतिकूलतेस तोंड द्यावे लागेल. घरगुती क्लेश मनाला यातना देतील. आईची प्रकृती मनात चिंता उत्पन्न करेल. सार्वजनिक जीवनात अपयश, अपकीर्ती होईल किंवा मान – प्रतिष्ठेची हानी होईल. पुरेशी विश्रांती व झोप न मिळाल्याने आरोग्य बिघडेल. उत्साह व स्फूर्ती राहणार नाही.

कुंभ
आज आपणास मोकळेपणा जाणवेल. शारीरिक स्वास्थ्य आपला उत्साह वाढवेल. शेजारी व भावंडांशी सौहार्दाचे संबंध प्रस्थापित होतील. स्नेहीजन घरी आल्याने आनंद वाटेल. प्रवासाची शक्यता आहे. मीन संक्रांति पासूनचा एक महिना आपल्यासाठी मध्यम फलदायी असेल. ह्या दरम्यान आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.

मीन
आज खर्च, संताप व जीभ यावर संयम ठेवावा लागेल. कोणाशी भांडण होण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार व पैश्यांच्या देवाण – घेवाणीत सावध राहावे. कुटुंबियांशी भांडण होईल. नकारात्मक विचार मनावर छाप पाडतील. ते दूर करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.  

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button