अकोल्यात सेवानिवृत्त पोलीस अधिकारी उतरणार निवडणुकीच्या आखाड्यात!

अकोले प्रतिनिधी
पोलीस सेवेत तब्बल 36 वर्ष सेवा केलेले सेवानिवृत्त पोलीस अधिकारी सुरेश गोंदके हे आता जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतरणार आहेत
अकोले तालुक्यातील करंडी येथील रहिवासी व मुंबई पोलीस मध्ये 36 वर्ष सेवा झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश गंगाराम गोंदके हे आता सेवानिवृत्तीनंतर जिल्हा परिषदेच्या राजकीय आखाड्यात उतरत आहे कोतुळ गटात भाजपकडून उमेदवारी मिळवण्याच्या त्यांचा प्रयत्न आहे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी श्री गोंदके यांचे
वडील गंगाराम गोंदके यांनी करंडी गावचे 15 वर्षे सरपंच पद भूषवले आहे या कुटुंबाचे स्व. माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या कुटुंबाशी कौटुंबिक संबंध होते आहे यामुळे त्यांनी माजी आमदार वैभव पिचड यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने कोतूळ जिल्हा परिषद गटात निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत त्यांनी ही माहिती माध्यमांना दिली येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये उतरण्याची तयारी त्यांनी सुरू केली असून जिल्हा परिषद गटातील प्रत्येक गावात ते संपर्क करत आहेत

36 वर्षे आपण पोलीस सेवेत प्रामाणिकपणे काम केले आता उर्वरित काळ आपला समाजसेवेसाठी घालवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला असून वडिलांच्या राजकीय पार्श्वभूमीचा तसेच स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या मुळा परिसरातील विविध विकास कामांच्या माध्यमातून मला विजयासाठी निश्चित फायदा होईल कोतुळ गटातील सर्वसामान्यमाणूस निश्चित माझ्यासोबत राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे
———



