पंचायत राज अभियानात संगमनेर पंचायत समितीला विभाग स्तरावरील पुरस्कार प्रदान

संगमनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या यशवंत पंचायत राज विकास अभियानात संगमनेर पंचायत समितीने सहा लक्ष रुपयाचा विभाग स्तरावरील तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस नुकतेच नाशिक महसूल आयुक्त व मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सदरचा पुरस्कार पंचायत समिती गट विकास अधिकारी अनिल नागणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वीकारला.
महाराष्ट्राच्या विकासामध्ये पंचायत राज संस्थांचे योगदान मोठे आहे.राज्यातील विकासाच्या सर्व योजना पंचायत राज संस्थांमार्फत राबविल्या जातात.शाश्वत विकासाचे ध्येय समोर ठेवून पंचायत राज संस्थांच्या कामगिरी नुसार त्यांना प्रोत्साहित करुन त्यांची कार्यसंस्कृती वाढविणे करीता राज्यात पंचायत राज संस्थांमधुन प्रशासकीय व्यवस्थापन व विकास कामात उत्कृष्ठ काम करणा-या पंचायत समित्यांसाठी विभाग व राज्य स्तरावर यशवंत पंचायत राज अभियान ही पुरस्कार योजना सुरु करण्यात आली आहे.
या अभियानामध्ये सन 2022-2023 मध्ये संगमनेर पंचायत समितीला नाशिक विभागस्तरावरील सहा लक्ष रुपयेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.विभागीय स्तरावर आयोजित केलेल्या सोहळयात हा पुरस्कार नाशिक विभागाचे विभागीय आयुक्त या. राधाकृष्ण गमे यांचे हस्ते मा श्री अशिष येरेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अहमदनगर यांचे प्रमुख उपस्थितीत श्री अनिल नागणे, पंचायत समितीच्या विविध अधिकारी कर्मचारी यांनी स्विकारला.
तसेच पंचायत समिती संगमनेरचे सहाय्यक लेखाधिकारी श्री प्रदिप वर्पे यांनाही सन 2019-2020 या वर्षासाठीचा यशवंत पंचायत राज अभियानात राज्यस्तरीय गुणवंत अधिकारी पुरस्काराने या सोहळयात सन्मानित करण्यात आले.पंचायत समिती कार्यालयाला हा मानाचा पुरस्कार मिळाल्या बददल सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.पुरस्कार मिळाल्याबद्दल राज्याचे महसुल,पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री मा ना.राधाकृष्ण विखे पाटील,मा आमदार बाळासाहेब थोरात,मा.खासदार सदाशिव लोखंडे,मा.खा.सुजय विखे पाटील,मा आमदार डॉ सुधीर तांबे,आमदार सत्यजीत तांबे,आ. डॉ किरण लहामटे,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
पंचायत समितीला सातत्याने विविध स्वरूपाचे पुरस्कार मिळत आहेत. या कामांमध्ये समितीच्या सर्व विभागांनी मा अशिष येरेकर,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,अहमदनगर यांचे मार्गदर्शनाखाली यशवंत पंचायत राज अभियानाचे निकषांनुसार त्यांना ठरवून दिलेल्या उदिदष्ठाचे पूर्तते बाबत प्रशासकीय व्यवस्थान व विकास कार्यामध्ये सांघिकरित्या उत्तम कामगिरी केली म्हणूनच हा पुरस्कार मिळाला आहे. अधिकारी व कर्मचारी यांनी सामूहिक भावनांना शासकीय योजनांची प्रभावी मार्गदर्शन करण्यासाठी योगदान दिले आहेत त्यामुळे पंचायत समिती संगमनेरला यश मिळत आहे.
– श्री अनिल नागणे, (गट विकास अधिकारी,प.स. संगमनेर)