मुंबईतील या ब्रिटीश कालीन रेल्वेस्थानकांचे नामांतरण करा

मुंबई दि १३
मुंबईतील अनेक रेल्वे स्थानके ब्रिटीश कालीन नावाने ओळखली जात असून सदर स्थानकांची नावे स्थानिक इतिहास पहाता नामांतरीत करणे महत्वाचे असल्याचे खासदार राहुल शेवाळे यांची म्हटले आहे
त्यांनी मुंबईतील स्थानकांचे नामांतरण करण्याची सूचना एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे केली आहे
पत्रातील या नमुद स्थानकांची नावे बदलण्याकरीता आपण तातडीने संबंधीत अधिकाऱ्यांना निर्देश द्यावेत,अशी विनंती. त्यांनी मुख्यमंत्र्यां कडे केली आहे
सद्या असलेली रेल्वेस्थानकांची नावे व त्यापुढे प्रस्थावीत नावे
१. करी रोड- चे – लालबाग
२. सॅन्डहर्स्ट रोड – चे – डोंगरी
३. मरीन लाईन्स- चे – मुंबादेवी
४. चर्नी रोड- चे – गिरगांव
५.कॉटन ग्रिन- चे – काळाचौकी
६. डॉकयार्ड- चे – माझगांव
७. किंग्ज सर्कल- चे – तिर्थंकर पार्श्वनाथ
असे मुंबईतील वरील ब्रिटिश कालीन रेल्वेस्थानकांची नामांतर करावे अशी मागणी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल रमेश शेवाळे यांनी केली आहे