५ कोटीं च्या त्या आरोपावरील मनसे चे आंदोलन आश्वासना नंतर मागे

प्रशासनावरील आरोपांची नाशिक आयजींच्या माध्यमातून
उच्चस्तरीय चौकशी- मनसे नेते अविनाश पवार
अहमदनगर-खासदार निलेश लंके यांना उपोषण न करण्यासाठी दिलेल्या ऑफर संदर्भात नेमका खरा प्रकार काय आहे?पोलिस प्रशासनावर केलेल्या ५ कोटीच्या आरोपावरून महाराष्ट्र पोलीसांची झालेली बदनामी तसेच सर्व सामान्य जनतेचा पोलिस प्रशासनावर असलेला विश्वास पोलिस प्रशासनावर झालेल्या आरोपांमुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊन संभ्रम निर्माण झाला आहे तो दुर करण्यासाठी व पोलीस प्रशासनाची प्रतीमा, विश्वासाहर्ता अबाधित ठेवण्यासाठी चांगल्याप्रकारे काम करणाऱ्या अधिकारी याचं मनोबल वाढवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुकारलेले अहमदनगर डी एस पी कार्यालय येथे सुरू असलेलं ठिय्या आंदोलन अखेर रात्री भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे उप निरीक्षक राजगुरू यांच्या विनंतीवरून उशिरा ८वाजता पोलिस उप अधीक्षक खैरे यांच्या सोबत चर्चा करून पोलिस प्रशासनावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समितीच्या माध्यमातून चौकशीसाठी नाशिक आय जी च्या माध्यमातून जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई होणार असल्याचे पोलीस उपअधीक्षक खैरे यांनी आय जी यांचं पत्र दाखवुन सांगितले असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पुकारलेले बेमुदत ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले.
महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांनी सांगितले
.यावेळी सहकार सेना जिल्हा अध्यक्ष नितीन म्हस्के, मनसे जिल्हा उपाध्यक्ष मारुती रोहकले, सुपा उप सरपंच दत्ता नाना पवार,माजी सरपंच बाळासाहेब पवार,उपचिटणीस मंगेश शिंदे,उपचिटणीस भालचंद्र आनंदकर, सुपा शहर अध्यक्ष अक्षय सुर्यवंशी, ज्ञानेश्वर गिरी, दत्ता पडवळकर यांच्या सह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते दिवसभरात आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
अहमदनगर जिल्हयात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू आहे. पोलिस प्रशानावर झालेल्या आरोपानांतर अवैध् धंद्यावर कारवाईचा फार्स सुरू आहे अशी जनतेत जोरदार चर्चा आहे.सत्ताधारी आणि विरोधक एकाच माळेचे मनी त्यामुळेच खा.लंकेनी ५ कोटींच्या केलेल्या आरोपावर जर गप्प बसुन आहेत त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण करून साटलोट करत अवैध् धंद्यावाल्यांकडून मोठा हप्ता सुरू करण्याचा डाव रचला जातोय असे मनसे नेते अविनाश पवार यांनी आंदोलन सोडताना सांगितले