ग्रामीण
सोनई मध्ये गोरोबाकाका यांना अभिवादन!

सोनई-प्रतिनिधी
कुंभार समाजाचे दैवत गोरोबाकाका यांची पुण्यतिथी सोनईत साजरी करण्यात आली.
समाजाचे मनोज बोरुडे व राणी बोरुडे यांनी गोरोबाकाका यांची मूर्तीची विधिवत आरती,पूजा, बोरुडे सपत्निक यांचे हस्ते करण्यात आली.
या प्रसंगी बबन बोरुडे यांचे ७१ व्या वर्षात पदार्पण झाल्याने पत्नी पार्वती बोरुडे यांना या निमित्ताने स्वाती कृषी सेवा केंद्राचे अर्जुन पटारे व पत्नी पटारे काकू यांनी पाची पोशाख देऊन सन्मान केला.
ह.भ.प.दिनकरराव टेमक यांनी वृक्ष लागवडीचे महत्व पटवून दिले. कार्यक्रमास पत्रकार विजय खंडागळे, माजी सरपंच चंद्रकांत टेमक,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र निंबाळकर, श्री.कुर्हे, रेखा तांदळे,आदी महिला मंडळ उपस्थित होते. आभार संदीप दरंदले यांनी मानले.या प्रसंगी प्रसादाचे वाटप करण्यात आले.