सुजित झावरे तालुक्याला मिळालेल विकासाभिमुख नेतृत्व – शिवानंद महाराज शास्त्री.

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
जामगाव येथे श्री.मळगंगा देवी सप्ताह निमित्ताने शेवटच्या दिवशी सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून श्री.मळगंगा देवी मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणे भूमिपूजन समारंभ शिवानंद महाराज शास्त्री यांचे हस्ते करण्यात आले.
जामगावातील ग्रामदैवत असलेले श्री.मळगंगा देवी परिसरात मोठ्या संख्येने भाविक उपस्थितीत असतात गावातील ग्रामस्थ यांनी सुजित झावरे पाटील यांच्याकडे काही दिवसापूर्वी मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणे बाबतची मागणी केली होती. यावेळी ग्रामस्थांच्या मागणीस्तव आज श्री. मळगंगा देवीच्या सप्ताह निमित्ताने मंदिर परिसरात पेव्हींग ब्लॉक बसविणे शुभारंभ करून काम सुरू करण्यात आले.
आता पर्यंत जामगाव मध्ये ग्रामपंचायत कार्यालय, बंधारे, के टी वेअर, शाळा खोल्या, पाण्याची टाकी, दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत रस्ते काँक्रीटीकरण, हायमास्ट दिवे, रस्ते, असे अनेक कामे सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. यावेळी पेव्हींग ब्लॉक दिल्या बद्दल सुजित झावरे पाटील यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आले. तसेच श्रीकृष्ण भक्त शिवानंद महाराज यांना सुजित झावरे पाटील यांनी “प्रेमसागर श्रीकृष्ण” हे आध्यात्मिक पुस्तक भेट दिली.
यावेळी शिवानंद महाराज शास्त्री म्हणाले की, सुजित झावरे पाटील यांचेकडे कोणतेही पद नसताना तालुक्यातील विकासकामासाठी सातत्याने निधी देत आहे. मी कायम प्रसारमाध्यमाद्वारे कायम पाहत असतो. आज प्रत्यक्षात काम पाहत आहे. सुजित झावरे यांच्याकडे राजकारणाबरोबर आध्यात्माची जोड आहे. राजकीय पद असताना काम कोणीही करतो परंतु पद नसताना समाजाची सेवा म्हणून विकासकामे करणे सोपे नाही. सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून सुसंस्कृत विकासाभिमुख नेतृत्व पारनेर तालुक्याला मिळालेले आहे.
यावेळी बाळासाहेब माळी, सोपान मुंजाळ सर, जगन्नाथ भुजबळ, बाळासाहेब शिंदे, शंकर महाडुळे, जयसिंग गुंजाळ, बाबासाहेब बांगर, मनोज शिंदे, आपा मेहेर, पांडुरंग हिलाळ, पिन्यू नाईकवाडी, किसनआप्पा भुजबळ, रामदास खाडे, दत्तात्रय खाडे, विष्णू नाईक, रामु खाडे, सुनिल शिंदे, दिनकर सोबले, दिलीप सोबले, प्रसाद मेहेर, सुभाष शिंदे, किसन भुजबळ, जालिंदर मेहेर, राजु खाडे, ज्ञानु खाडे, जालु खाडे, बाबासाहेब बांगर, शिवा मेहेर,समिर मांढरे, दत्ता नाईक, ज्ञानदेव घावटे,ज्ञानेश्वर मुंजाळ, सुमित नाईक व मान्यवर मंडळी उपस्थित होते.
