अहमदनगर
राजापूर च्या नूतन महाविद्यालयास नॅकचे “B” मानांकन

संगमनेर दि.१७
प्रागतिक शिक्षण संस्थेच्या नूतन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, राजापूर, ता.संगमनेर या महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेने (नॅक) नुकतेच मूल्यांकन करून मानांकन बहाल केले. महाविद्यालयाला "B" ग्रेड मिळाली आहे. 26 व 27 फेब्रुवारी रोजी नॅक मूल्यांकन समितीने भेट दिली. या मूल्यांकन समितीत चेअरमन म्हणून डॉ. अरविंद कुमार सिंग, समन्वयक डॉ. सबीयासाची पटनाईक व सदस्य डॉ. लता व्हर्गीस यांनी महाविद्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यांकन केले. मूल्यांकनात महाविद्यालय इमारत, परिसर, मैदान, विद्यार्थी - विद्यार्थिनींसाठी उपलब्ध सुविधा, राबविण्यात येणारे उपक्रम, अभ्यासक्रम, विविध उपक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग, पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना मिळालेला रोजगार, प्राध्यापक यांचे दर्जेदार शिक्षण देण्यात येणारे योगदान इत्यादींचे परिक्षण करण्यात आले.
महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकन प्रक्रियेत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग, IQAC समन्वयक डॉ. संगीता जांगिड, सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली. तसेच प्रागतिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲड. अनिल गोडसे उपाध्यक्ष श्री. आर. पी. हासे सेक्रेटरी ॲड कैलास हासे व संस्थेच्या सर्व संचालकांनी वेळोवेळी मदत व मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे पहिल्यांदाच नॅकने परिक्षण केले व "B" ग्रेड मिळाल्याने शैक्षणिक क्षेत्रात महाविद्यालयाची मान उंचावली आहे तसेच महाविद्यालयाचे कौतुक करण्यात येत आहे. महाविद्यालयात आता विविध प्रकारचे व्यावसायिक व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्याचा मानस संस्था पदाधिकारी यांनी व्यक्त केला . महाविद्यालयाचे नॅक करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने प्राचार्य डॉ.सुभाष कडलग समाधान व्यक्त करत आहे व महाविद्यालयाचा झालेला कायापालट बघण्यास आपण आवर्जून भेट द्यावी असे आवाहन करत आहे.