तर परभणी जिल्हाधिकरी कार्यालया समोर भजन आंदोलन – कलावंतांचा इशारा

परभणी दि 31
कोरोनाचे नियम पाळुन सर्व व्यवहार सुरळीत झाले असून लोककलावंतांना सुध्दा कोरोनाचे नियम पाळुन जनजागृतीचे कार्यक्रम तातडीने देण्यात यावे अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन आंदोलन करत बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र लोक कलावन्त संघटनेने दिला आहे
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या या महामारीमुळे लोककलावंताच्या हाताला काम नसुन लोककलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने वरील संदर्भिय शासन निर्णय आपल्याकडे पाठविला असतांना सुध्दा कलावंतांच्या कार्यक्रमाचे कसलेही नियोजन केले जात नाही. तसेच कलावंतांच्या संघटनेमार्फत अनेक वेळ आपणास व संबंधित
अधिकाऱ्यास निवेदन दिले असता निवेदनाची दखल घेतली जात नसून शासन निर्णयास व मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशास केराची टोपली दाखविली जात आहे.गेल्या महिन्यांपासून टप्याटप्याने सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले असून आता शाळा / कॉलेज हे सुध्दा सुरू झालेले आहे. मग कलावंतांनाच का वेठीस धरल्या जात आहे. हे कळायला मार्ग नाही. लोककलावंताच्या हाताला काम नसल्यामुळे कलावंताची उपासमार पाहुन शासनाने शासन निर्णय काढुन कलावंतांना कमीत कमी कलावंतांच्या संख्येमध्ये शासनाच्या योजनांची जनजागृती करावी असे स्पष्ट आदेश असतांना अद्यापही शासन निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा प्रशासन व संबंधीत अधिकारी करत नाहीत. अनेकवेळा
निवेदन देऊन सुध्दा लोककलावंताच्या या व्यथांची दखल घेतली जात नाही. त्यामुळे कलावंतांमध्ये निराशेचे वातावरण आहे. कारण कलावंतांना कलेच्या माध्यमातुन उपजिवीका उपलब्ध होत नसेल तर कलावंतांनी करायचे काय आणि जगायचे कसे हा गंभीर प्रश्न कलावंतांना भेडसावत आहे.
ज्याप्रमाणे इतर व्यवहार सुरळीत केले त्याप्रमाणे कोरोनचे पालन करून लोककलावंतना शासनाच्या योजनांची जनजागृती करण्यासाठी वरील शासन निर्णयाप्रमाणे
तात्काळ आदेश देण्यात यावे अशी मागणी केली आहे
या निवेदनावर दिनांक 07 फेब्रुवारी 2022 पर्यंत निर्णय नाही
झाल्यास आठ फेब्रुवारी 2022 पासुन परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर परभणी जिल्ह्यातील लोककलावंत आमरण उपोषणास बसतील व भजन आंदोलन करतील.
आमच्यावर वेळ येऊ नये म्हणुन आमच्या या निवेदनावर तात्काळ कार्यवाही व्हावी शाहीर शिवाजी सुगंधे शाहीर मुंजाजी वाळवंटे शाहीर अंकुश वाटुरे शाहीर काशिनाथ उबाळे
संगितकार लक्ष्मण ससाणे शाहीर अशोक नरवाडे शाहीर विजय सातोरे शाहीर मल्हारी खंडागळे शाहीर भारत मुंजे गायीका भारती राऊत शाहीर प्रकाश कांबळे शाहीर के.आर.मस्के