कल्याण ते राजूर एस टी बस सेवा पुन्हा सुरू

अकोले प्रतिनिधी
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्ली, मुंबई विभाग अध्यक्ष रामनाथ भोजने श्री तानाजी दादा कर्पे प्रतिष्ठाण, कल्याण,यांच्या पाठपुराव्यां नंतर कल्याण ते राजूर (मेचकर वाडी) एस टी बस सेवा पुन्हा सुरू करण्यात आली
भाऊ बिजेच्या शुभमुहर्तावर आज बुधवार दिनांक 15/11/2023 रोजी ही बस सेवा पूर्ववत सुरु झाली
सकाळी 7.00 वाजता कल्याण वरुन सुटणारी ही बस कल्याण ,मुरबाड ,माळशेज ओतूर आळेफाटा बोटा ब्राम्हणवडा,कोतुळ मार्गे राजूर मेचकरवाडी येथें दुपारी 1 वाजता पोहचते राजूर येथुन पुन्हा या बस चा
परतीचा प्रवास दुपारी 2.00 वाजता सुरु होऊन सायंकाळी 6 वाजता पुन्हा कल्याण ला पोहचणार आहे
नोकरी निमित्ताने मुंबईत असणाऱ्या अकोले तालुक्यातील अनेक प्रवाशांना या एसटी बसचा फायदा होणार आहे
एस.टी.चा प्रवास सुखाचा – सुरक्षित प्रवास
असून नागरिकांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामनाथ भोजने, श्री तानाजी कर्पे, डॉ रवींद्र जाधव ,श्री होडगर सर, दिगंबर नवाळे यांच्या उपस्थिती आज या गाडीचा शुभारंभ झाला श्री. राजु मेमाने, श्री. भाऊसाहेब जगधने, श्री. राणू होडकर तसेच कल्याण आगार प्रमुख श्री भोये ,कंट्रोल ऑफिसर अशोक सगभोर, वाहतुक नियंत्रक श्री गोसावी यांनी केले आहे
