होळीमध्ये दुर्गुणां चे दहन करा- जादूगार हांडे , अकोल्यात पर्यावरण पूरक होळी साजरी

अकोले प्रतिनिधी
जादुगार पी. बी.हांडे सोशल फाउंडेशनच्या वतीने अकोले येथे पर्यावरण पूरक होळी साजरी केली
. सदर प्रसंगी जादूगार हांडे यांनी सांगितले की होळीचा सण पर्यावरण कचऱ्याची होळी करा व होळीत अवगुणांचे अपप्रवृत्तींचे दहन करा .सण साजरे करताना पर्यावरणास धोका पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी .परिसरातील कचरा गोळा करून होळी दहन करा तसेच भ्रष्टाचार, अंधश्रद्धा अनिष्ठ रूढी, दहशतवाद , बलात्कारी प्रवृत्ती, लाचखोरी ,रासायनिक रंग वापर या अवगुणांचे दहन करावे होळीत अन्नधान्य, नैवेद्य जाळू नये.तसे फलक होळीवर लावले होते.
संस्था विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहन मदत,अंधश्रद्धा निर्मूलन व्याख्याने, व्यसनमुक्ती प्रबोधन कार्य , फटाके मुक्त दिवाळी ,इत्यादी उपक्रम राबवत असते सदर प्रबोधन उपक्रमात मंदाकिनी हांडे ,ज्येष्ठ पत्रकार भाऊसाहेब मंडलिक, डॉक्टर सुभाष आरोटे, मेजर संतु भोर ,शशिकांत बोराडे, रमेश वाघ ,किसन मंडलिक, रंगनाथ भोसले , ए .बी. देशमुख, लोखंडे तात्या ,आवारी साहेब, सरिता धुमाळ, सुखदेव शेटे ,सुनीता तळेकर, प्रशांत धुमाळ राम तळेकर इत्यादी मान्यवर नागरिक उपस्थित होते.
