अकोलेत कांदा रुपये 1701/-

अकोले/प्रतिनिधी
कृषि उत्पन्न बाजार समिती, अकोले मध्ये दिनांक 26/03/2024 रोजी कांदा 4515गोणी आवक झाली असुन कांद्यास खालील प्रमाणे बाजार भाव मिळालेले आहेत
न.1 ला रु 1401 ते 1701
न.2 ला रु.1101 ते 1401
न.3 ला रु.701 ते 1101
गोल्टी रु. 501 ते 701
खाद रु. 201 ते 501 प्रमाणे बाजार भाव मिळाले आहेत.
अकोले बाजार आवारात रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवशी लीलाव होत आहेत. शेतकरी वर्गाचे विक्रीस आलेल्या कांदा योग्य बाजार भाव मिळत आहेत. कांदा लिलाव वेळेत पूर्ण करण्याचे दृष्टीने कांदा वजन लिलावाच्या आदल्या दिवशी दुपारी 1 ते रात्री 7.30 पर्यंत व लिलावाच्या दिवशी सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत केले जाईल, तसेच कांदा विक्री केल्यानंतर विक्री पट्टी पेमेंट रोख स्वरूपात आहे, याची हमाल, मापाडी, आडत व्यापारी, शेतकरी बंधूनी नोंद घ्यावी.
तरी शेतकरी वर्गाने आपला शेतीमाल योग्य बाजार भाव, इलेक्ट्रॉनिक काट्यावर रास्त वजन,रोख पेमेंट मिळण्यासाठी बाजार समितीचे मुख्य बाजारात विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती भानुदासजी तिकांडे, उपसभापती रोहिदासजी भोर, बाजार समिती संचालक व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे.