अहमदनगर

शेवगाव तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली ! कारवाई साठी उपोषणाचा इशारा

अहमदनगर विशेष प्रतिनिधी

शेवगाव तालुक्यातील भायगाव येथील गट नंबर २४५ /१ या क्षेत्रामध्ये जाण्या येण्यासाठी असणाऱ्या वहीवाटीच्या रस्त्यावरील गट नंबर २१७ / १ मधील अतिकमण काढून बंद असलेला रस्ता व गट नंबर २१७ /३ मधील अतिक्रमण काढुन रस्ता येण्या जाण्यासाठी खुला करावा यासाठी २०२२ मध्ये केस क्रमांक २७ / २०२२ दाखल केस. त्यानुसार तहसीलदार साहेब यांनी योग्य ती चौकशी करून स्थळ निरीक्षण पंचनामा करून त्यानुसार मा. तहसिलदार साहेब शेवगाव यांनी सदर रस्त्यावरील अतिक्रमण काढून रस्ता खुला करण्यासाठी दिनांक १३ / ८ / २० २३ रोजी आदेश दिला.

त्या आदेशानुसार संबंधित शेतकऱ्याने दिनांक ११/ १२ /२०२३ रोजी रस्ता खुला करण्याकामी शेवगाव तहसिलदाराकडे अर्ज केला. त्यानंतर दिनांक ५ / २ /२०२४ पुन्हा तहसिलदार साहेब यांना स्मरणपत्र देण्यात आले. त्यानुसार पोलीस संरक्षण घेऊन दिनांक १९ / ३ / २०२४ रोजी खुला करण्यासाठी संबंधी भातकुडगाव मंडलधिकाऱ्या मार्फत नोटीस देऊन रस्ता खुला करण्यासाठी हजर झाले. मात्र त्यांनी रस्ता खुला केला नाही.

यासंबधी दत्तु चंद्रभान आगळे यांनी शेवगाव कार्यालय येथे तहसीलदार साहेब यांची समक्ष भेट घेऊन यासंबंधी माहिती दिली.मात्र रस्ता खुला झाला नाही. म्हणून त्यांनी तहसीलदार साहेब शेवगाव यांच्या आदेशा प्रमाणे रस्ता खुला करावा,दिनांक १९/०३/२०२४ रोजी रस्ता खुला करणे कामी मंडलाधिकारी व भायगाव सजेचे कामगार तलाठी यांच्या विरुद्ध रस्ता खुला करणे कामी तहसीलदार साहेबांच्या आदेश आदेश पालन न केल्यामुळे त्यांची चौकशी होऊन कार्यवाही करण्यात यावी व भातकुडगाव मंडलाधिकारी यांना दि. १७ ते २० पर्यंत या कालावधीत रस्ता केस मधील सामनेवाले अगर रस्ता केसच्या संदर्भात कोणाकोणाचे फोन आले याचा तपशील घेऊन मंडलाधिकाऱ्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी या मागण्यासह दिनांक दि. २७ /०३/ २०२४ पासुन आमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

या निवेदनाच्या प्रत मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी साहेब अहमदनगर, प्रांताधिकारी साहेब पाथर्डी भाग पाथर्डी, तहसीलदार साहेब शेवगाव, पोलीस निरीक्षक साहेब शेवगाव पोलीस स्टेशन यांना पाठवण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button