निलेश लंके यांचा आमदारकीचा राजीनामा!
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे असेल तर खास करून आपल्या पारनेर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक करून पारनेर करांच्या अस्तित्वाच्या लढाई साठी बाहेर पडले पाहिजे.असे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले ते सुपा येथील आयोजित कार्यकर्ता मेळावा प्रसंगी केले.
लोकसभा निवडणुकीचा पसारा मोठा आहे.जिल्हयातील श्रीगोंदा, पाथर्डी , राहुरी, शेवगाव, पारनेर, या तालुक्यांतील ग्रामीण भागात शेवटच्या टोकापर्यंत पोहचायचे असेल तर आपल्याला मेहनत घ्यावी लागेल.या प्रत्येक तालुक्यांतील प्रत्येक जण आपल्याला मदत करणार आहे. पण ही निवडणूक पारनेर करांच्या अस्तित्वाची लढाई आहे .निलेश लंकेला निवडणुकीचा जर दगा फटका झाला तर सर्वसामान्यांच्या राजकारणाला आळा बसेल . सर्व सामान्य माणूस संपला जाईल.पारनेर करांचे अस्तित्वाची लढाई आहे.पारनेरकरानी निवडणूक हातात घेतली पाहिजे प्रत्येकाने मी निवडणुकी स्वतः उमेदवार आहे.असे समजून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचं आहे.जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात फिरत असताना जामखेड, पैठण ,राहुरी ,संगमनेर, एवढा मोठा मतदारसंघ आहे या संघात आपल्याला भविष्यात तोंड द्यायचा असेल पारनेरकरणी अस्तित्वासाठी बाहेर पडले पाहिजे . पारनेर तालुक्यांतील दोन नंबरची फळी आहे त्यांनी गाव सांभाळले पाहिजे. आणि गावागावात आता सांगितलं पाहिजे की आपल्या पारनेर करांच्या अस्तित्वाची लढाई आहे.ऍडव्होकेट गुलाबराव शेळके यांनी प्रयत्न केला त्यांना यश आलं नाही .आपल्या तालुक्याचे अस्तित्वाची लढाई प्रत्येक गावात ग्रामपंचायत मध्ये एकमताने ठराव केले पाहिजे केले. आपल्या तालुक्याची अस्मिता आहे. आपल्या तालुक्याचे लढणारा माणूस आहे. हे समजून सांगितले पाहिजे लोकांचे घराघरात गेले पाहिजे . समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी व विकास करण्यासाठी एक झालं पाहिजे.या समोरील धनशक्तीला जागा दाखवुन देण्याची गरज आहे. पारनेर तालुक्यातील प्रत्येक गावातली ग्रामपंचायत साठी मी विकास कामासाठी काही ना काही मोठ्या प्रमाणावर दिला आहे.मी कधी स्थानिक ग्रामपंचायत मध्ये इंटरफर केला नाही.ग्रामपंचायत बिनविरोध झाली पाहिजे आणि त्या माध्यमातुन गावाचा विकास झाला पाहिजे.हाच प्रामाणिक हेतू घेउन मी गेली पाच वर्ष मतदार संघात काम करत आहे. प्रत्येक गावात मी पाच कोटी, दहा कोटी ,काही ना काही काम दिले ना गैरसमज निर्माण झाला असेल तर त्याला मी सांगू शकतो कोणत्या ग्रामपंचायत मध्ये इंटरफेअर केला मी आमदार झाल्याने गावागावातील ग्रामपंचायत मधील संघर्ष थांबला पाहिजे. यासाठी मी सतत प्रयत्न केला ग्रामपंचायत मध्ये एक विचार झाला तर गावाचा विकास होणार आहे गावातील ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध केल्या पाहिजे आता लोकसभेचा उमेदवार हा तुमच्या घरातला उमेदवारी हे लोकांना समजून सांगितले पाहिजे .उद्या सरपंचाला हे म्हणतील हे पैसे घे ते म्हणतील पैसे घ्या पण यावेळेस यांचे भूलथापांना बळी न पडता पारनेर करांचे अस्तित्वासाठी एकदिलाने लढले पाहिजे. प्रत्येकाने निवडणुकात हातात घेतली पाहिजे .त्यांनी दिवाळीला फराळ वाटपाचे पत्रिका वाटल्या. त्यांनी संभाजी महाराजांच्या नाटकाचे पासेस वाटले त्यांनी तालुक्याच्या विकासासाठी पुढे आले पाहिजे.प्रत्येक तिथे गावात आपला कार्यकर्ता गेला पाहिजे .मी सांगण्यापेक्षा प्रत्येकाने पुढे आले पाहिजे. जिंकायचं असेल तर सर्वसामान्य लोकांची ताकद काय असते ते दाखवुन दीली पाहिजे. तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न केला जातो तुमच्याकडे पैसे आहेत तर आमच्याकडे लोक आहेत.हे सांगता आले पाहिजे.तालुक्यांत तूम्ही तुमच्या कारकीर्दीत एक जरी प्रोजेक्ट आणला का ते सांगा जिल्ह्यासाठी काय केलं ते सांगा.तुमच्या कडे सत्ता असताना जिल्ह्यातील एक मेडिकल तुम्ही आणू शकत नाही. एक शासकीय कॉलेज जिल्ह्यात आणू शकले नाही. कारण आपल्या जिल्ह्यात जर दुसरी कडे मेडिकल कॉलेज झाले तर आपले दुकान बंद पडल हि भीती यांना वाटत आहे.आमचे हॉस्पिटल चालले पाहिजे .आमची यंत्रणा चालली पाहिजे .लोकांना फक्त आश्वासन द्यायचे लोकांना फसवायचं प्रत्येक तालुक्यात जायचं मोजके बगल बच्चे हाताशी धरायचे त्यांना आमिष दाखवायचे हेच धंदे यांनी केले.त्यांना यंत्रणा म्हणुन वापर करायचा हेच धंदे त्यांनी केले.त्यांचे या बगलबच्चन एकच सांगा २४ तास ३६५ दिवस सेवा देण्याचं काम या निलेश लंकेने केले. स्वतःचा कधी विचार केला नाही. आजारी जरी असलो तरी डॉक्टर साहेब मला कार्यक्रमाला जायचे सलाईन काढा.एखाद्या पेशंटचा फोन आला तर त्याला भेटायला रात्रीअपरात्री गेलो. पारनेर तालुक्यातील सहायता निधीतून सगळ्यात जास्त मदत या आपल्या पारनेर तालुक्याला मिळवून दिली आहे. या वेळी तालुक्यांतील व तालुक्या बाहेरील बहुसंख्य कार्यकर्ते मेळाव्या प्रसंगी उपास्थित होते.