स्वराज्य रक्षक फाउंडेशन व भक्ती सिद्धांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महिलाना आरोग्य विषयक शिबीर!

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी :
-दिनांक 27 रोजी शिरूर येथे स्वराज्य रक्षक फौंडेशन व सिद्धांत हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्यविषयी सल्ला व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी डॉक्टर कीर्ती मदने, भक्ती सिद्धांत हॉस्पिटल च्या सर्वेसर्वा यांनी स्वतः विषयी माहिती सांगत, आपण जर मनाने प्रसन्न राहिलो तर आजार जवळ येताना विचार करून येईल, आपण स्वतः स्वतःला किंमत देऊ लागलो व स्वतः ची काळजी घेऊ लागलो तर बऱ्या पैकी आजार कमी होतील. आजकाल बाजारात मिळणारे भेसळ युक्त व हायब्रीड अन्नधान्यामुळे शरीराला पौष्टिक असे काहीच मिळत नाही त्यामुळे बऱ्यापैकी आजार तिथूनच जन्म घेतात तसेच महिला स्वतःकडे कशा दुर्लक्ष करतात व आजार लपवून ठेवत असतात त्यामुळे मोठ्या आजारांना आमंत्रण देतात हे सांगत स्वतः काळजी घ्या म्हणजे इतरांची आपोआप घेतली जाते व स्त्रिया म्हणजे एक वरदान असून तिची बरोबरी या जगात दुसरे कोणीही करू शकत नाही म्हणून स्वतःला स्पेशल मानत ,काळजी घेतली तर आपण आजारी पडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी त्यांनी स्वराज्य रक्षक फाउंडेशन व त्यांच्या सर्व टीमचे आभार मानले.महिलांनी शिवलेल्या टाकाऊ कपड्या पासून टिकाऊ पिशव्या शिवत प्लास्टिक बंदीकडे पाऊल तर उचललेच आहे शिवाय प्लास्टिक मुळे होणारे रोग ही थांबवण्यास त्या मदत करणार आहेत म्हणून सर्व महिलांचे व त्यांना प्रशिक्षण देणाऱ्या मनीषाताई वाळुंज यांचे विशेष कौतुक केले.
स्वराज्य रक्षक फाउंडेशन अंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या जवळजवळ 40 ते 50 महिलांनी फाउंडेशनचे व रामलिंग ग्रामपंचायतचे आभार मानत भविष्यातही आम्हाला पिशव्या मार्केटिंगसाठी व छोटे छोटे उद्योग उभारणीसाठी पाठबळ द्यावे अशी नम्र विनंती केली. या मध्ये स्वाती ताम्हणे,नीता थोपटे तसेच अनेक महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित असणाऱ्या पत्रकार रुपाली खिल्लारी यांनी शिक्षण घेणाऱ्या सर्व महिलांचे विशेष कौतुक केले.
स्वराज्य रक्षक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी लेंडे, सचिव प्रथमेश चाळके व इतर सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.किर्ती मदने, रूपाली खिल्लारी,नम्रता गवारे, मनिषा वाळुंज व इतर अनेक मान्यवर व प्रशिक्षण घेणाऱ्या व रामलिंग रोड येथे राहणाऱ्या अनेक महिला उपस्थित होत्या.