पळवे येथे मारुती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास प्रारंभ

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
पळवे खुर्द मठ वस्ती येथील मारुती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहास शुक्रवार दिनांक 5 एप्रिल पासून प्रारंभ झाला. सप्ताह निमित्त दररोज परमेश्वर महाराज दंडवते यांच्या भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

पहाटे चार ते सहा काकडा भजन, सात ते अकरा ज्ञानेश्वरी पारायण सायंकाळी सात ते दहा भागवत कथा सोहळा, रात्री 11 ते 4 हरी जागर असे दैनंदिन कार्यक्रमाचे स्वरूप आहे. शुक्रवार दिनांक 5 रोजी परमेश्वर महाराज दंडवते यांच्या भागवत कथेस प्रारंभ झाला.श्रीमद भगवत महात्मे व मंगलाचरण नारद चरित्र्याने कथेस प्रारंभ झाला.
शनिवार दिनांक 6 रोजी राज परीक्षित चरित्र, सुखदेव आगमन विदुर मैत्रीय व समागम वराह अवतार या विषयावर कथा झाली. रविवार दिनांक 7 रोजी कपिल घेता दक्ष यज्ञ ध्रुव नृत्य भदेव जड भरत आजा मेळ आख्यान ऋता सुखद सोमवार दिनांक 8 रोजी भक्त प्रल्हाद चरित्र, गजेंद्र महोद वामन मच्छ अवतार, अंबारी से चरित्र, गंगा अवतरण श्रीरामचरित्र, श्रीकृष्ण जन्म, मंगळवार दिनांक 9 रोजी श्रीकृष्ण लीला, माखन चोर लीला, गोवर्धन लीला, बुधवार दिनांक 10 रोजी महाराष् गोपीनाथ कंस वैद्य उद्धव गोपी संवाद, श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह, दिनांक 11रोजी सुदाम चरित्र वसुदेवास नारदासा उद्देश श्रीकृष्ण उद्धव संवाद भागवत धर्म धर्मभक्ती यदु कुल संहार, श्रीकृष्ण निजाधाम गमन आधी प्रसंगावर कथा होणार. शुक्रवार दिनांक 12 रोजी ह भ प आचार्य परमेश्वर महाराज दंडवते सकाळी नऊ ते 11 काल्याचे किर्तन होणार आहे कीर्तनानंतर ग्रामस्थांच्या वतीने होणार आहे कार्यक्रम सुरू होण्यापासून सुरुवातीपर्यंत ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. या ठिकाणी विना पहारा चोख ठेवण्यात आला आहे. या सप्ताहाचे 17 वे वर्ष आहे अशी माहिती संघर्ष मित्र मंडळाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी महिलांची जास्त हजेरी असते अशी माहिती निवेदक संतोष तरटे सर यांनी दिली