इतर

आश्रमशाळा समस्यांबाबत मुख्याध्यापक संघाचे प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन.

अकोले प्रतिनिधी 

-महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ यांच्या वतिने आज दि.24/06/2025 रोजी एकात्मिक आदिवासी.विकास प्रकल्प कार्यालय राजुर अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेतील विविध समस्यांबाबत प्रकल्प अधिकारी श्रीमती देवकन्या बोकडे यांना निवेदन देऊन प्रत्येक विषयावर चर्चा करण्यात आली

 सदर प्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी मनोजकुमार पैठणकर,लेखाधिकारी संजय सोनवणे हे उपस्थित होते.यावेळी आश्रमशाळेतील समस्यांबाबत तात्काळ प्रश्न सोडविणेबाबत मुख्याध्यापक संघाला आश्वस्त करण्यात आले.

.रिक्तअधिक्षक/अधिक्षिका पद भरण्याबाबत,आश्रम शाळेवरील बहुउद्देशीय पदे तात्काळ भरणे, राजूर प्रकल्पांतर्गत करण्यात आलेल्या प्रतिनियुक्ती रद्द करून सदर कर्मचाऱ्यांस मुळ आस्थापनेवर हजर करणे,निवासी एक ते चार वर्गातील विद्यार्थ्यांच्या आंघोळ व कपडे धुण्यासाठी केअर टेकर नेमणे, प्रलंबित देयके मंजुर करणे,शाळा सशक्तीकरणासाठी शाळा व्यवस्थापन समितीला आवश्यक निधी मिळावा,मजुरी तत्त्वावर रिक्त पदावर स्थानिक पातळीवर मनुष्यबळ उपलब्ध करण्यास  परवानगी द्यावी, आश्रमशाळेत भौतिक सोईसुविधांबाबत प्राधान्यक्रमाने सोडवणूक व्हावी या व इतर मागण्यांबाबत मुख्याध्यापक संघामार्फत निवेदन देऊन सकारात्मक चर्चा करण्यात आली.

 यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री.शिवराज कदम, उपाध्यक्ष श्री.आदिनाथ सुतार, सचिव श्री.शिरसाठ, श्री शिवाजी नरके, कोषाध्यक्ष श्री.विष्णु नेहे,राम मयेकर, पंडित कदम,नवनाथ गायकवाड,शिवनाथ खेडकर,

चंदन बडवे,किशोर शिंदे, मनियार सर,शेख सर व अहिल्यानगर जिल्ह्य़ातील विविध आश्रम शाळांचे मुख्याध्यापक हजर होते.सदर प्रसंगी मागण्यांबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रकल्प अधिकारी यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button