मुळा उजवा कालव्याचे उन्हाळी आवर्तनांने लाभ क्षेत्रातील पाणी प्रश्न सुटेल.– चंद्रशेखर घुले

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
मुळा उजवा कालव्याचे शेतीसाठी उन्हाळी आवर्तन चालू आहे. या आवर्तनामध्ये शेवगाव -पाथर्डी पाणीपुरवठा स्रोत उपलब्ध असलेल्या ठिकाणी ते भरल्यास लाभ क्षेत्रातील पिण्याचा पाण्याच्या प्रश्नसह पशुधनाचा पाण्याचा प्रश्न चांगल्या प्रकारे सुटेल. व काही प्रमाणात चाराही उपलब्ध होईल व या भागात शेवटच्या टप्प्यात पिण्यासाठी टँकर मार्फत पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार नाही. यासाठी दोन्ही तालुक्यातील लाभ क्षेत्रातील पिण्याचे पाण्याची स्रोत भरण्यास तात्काळ परवानगी द्यावी.अशा आशयाची मागणी शेवगाव – पाथर्डीचे माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजितदादा गटाचे )जिल्ह्याचे नेते चंद्रशेखर घुले पाटील यांच्यासह एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी श्री. सिद्धाराम सालीमठ साहेब व कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना निवेदन दिले आहे
.यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजयजी कोळगे, उपसभापती गणेश खंबरे, अंबादास कळमकर, माणिक बुधवंत, डॉ. सुधाकर लांडे,राजेंद्र आढाव, अशोकराव मेरड,राहुल बेडके,राजेंद्र देशमुख,विक्रम लोंढे, उदयजी बुधवंत,संजय बुधवंत आनंद सावंत जगन्नाथ साबळे शहादेव खोसे,बबनराव जाधव,कांताशेठ निकम,लक्ष्मणराव नांगरे, गंगाधर शेळके तुकाराम मुळे संजय मराठे गहिनीनाथ टेमकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेतकरी आधीच आर्थिक अडचणीतून जात असल्याने शेतीला पूरक असलेल्या पशुधन वाचवण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.त्यासाठी पाणीटंचाई सारखे महाकाय संकट शेतकऱ्यासमोर आहे. त्यामुळे चालू आवर्तनात शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील टेलच्या भागापर्यंत उपलब्ध पिण्याच्या पाण्याचे स्रोत चालू असलेल्या आवर्तनातून भरल्यास या भागातील पिण्याच्या पाण्यासह शेतीला पूरक असणाऱ्या पशुधनचारा निर्मितीसाठी मोठी मदत होईल
.संजयजी कोळगे
जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
शेवगाव तालुक्यातील भायगाव येथे उपलब्ध असणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी तलाव चालू आवर्तनातून भरल्यास गावच्या पाण्याचा शंभर टक्के पाणी प्रश्न सुटेल. त्यासाठी भायगाव ग्रामपंचायतच्या वतीने तसे पत्रही कार्यकारी अभियंता सायली पाटील यांना देण्यात आले आहे. या आवर्तनातून छोटे-मोठे बंधारे व पाणी स्रोत न भरल्यास पिण्याच्या पाणीची बिकट समस्या परिस्थिती निर्माण होईल.
राजेंद्र आढाव
सरपंच ग्रामपंचायत भायगाव