नेप्तीत समता परिषदेच्या वतीने महात्मा फुले जयंती साजरी.

महात्मा फुले यांचे कार्य प्रेरणादायी : रामदास फुले
अहमदनगर: नगर तालुक्यातील नेप्ती येथील संत सावता महाराज मंदिरात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ग्रामस्थाच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी पाणी बचतीचा व मतदान जागृतीचा संदेश देण्यात आला .
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शाखा अध्यक्ष शाहूराजे होले यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच नेप्ती ग्रामपंचायत मध्ये सुद्धा मोठ्या उत्साहात दिमाखात महात्मा फुले जयंती साजरी करण्यात आली. उपसरपंच दादू चौगुले यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, समता परिषदेचे नगर तालुका अध्यक्ष रामदास फुले ,माजी सरपंच अंबादास पुंड, संजय जपकर, सुधाकर कदम ,उपसरपंच दादू चौगुले, जालिंदर शिंदे, पोलीस पाटील अरुण होले, प्रा. एकनाथ होले प्रा. भाऊसाहेब पुंड, भानुदास फुले ,ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ पुंड, गोरख फुले, बाळनाथ पुंड , सचिन पुंड, सुरेश कदम ,रवी पुंड ,सखाराम बेल्हेकर, मिलिंद होले, राजू होळकर, पाराजी होळकर ,नानासाहेब बेल्हेकर, तुषार भुजबळ, सौरभ भुजबळ ,नितीन पुंड ,ओंकार भुजबळ, संभाजी होले, नितीन शिंदे ,सार्थक होले ,सिद्धार्थ शिंदे ,रमेश रावळे व परिसरातील समता सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा फुले यांनी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षणाचा प्रचार केला. समाजाला प्रबोधन व परिवर्तनाचे काम केल्याचे समता परिषदेचे तालुका अध्यक्ष रामदास फुले यांनी सांगितले
