खासदार लोखंडे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठीचे कोट्यावधी चे अनुदान लाटले!

खासदारकी रद्द करण्याची केली मागणी
महादर्पण वृत्तसेवा
स्वतःची पत्नी, मुले आणि सुना यांच्या कंपनीला सरकारचे कोट्यवधींचे अनुदान मिळवून देऊन खासदार सदशिव लोखंडे यांनी आपल्या खासदारकीचा दुरुपयोग केला असल्याची
तक्रार शेतकरी नेते डॉ. भारत करडक यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे कागदपत्रे पाहून
खा. सदाशिव लोखंडे यांच्या या कथित भ्रष्टाचाराची तातडीने चौकशी करण्यासाठी तसेच त्यांची खासदारकी रद्द करण्यासाठी आपण राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष आणि
पंतप्रधान यांच्याकडे तक्रार करावी,
असे साकडे डॉ. करडक यांनी आज ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना घातले.
केंद्रीय अर्थसंकल्पात सन २०१८-१९ सालात
सालात ‘मिशन ऑपरेशन ग्रीन या योजनेची
घोषणा करण्यात आली. त्या योजनेत कांदा, बटाटा आणि टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी
भावात घसरण झाल्यास मदत करणे आणि भविष्यात हा नाशवंत शेतमाल लगेच खराव होऊ नये, म्हणून कोल्ड स्टोरेज आणि
वाहतुकीच्या सुविधा निर्माण करणे, यासाठी देशातील शेतकऱ्यांसाठी तब्बल ५०० कोटी रुपयांच्या अनुदानाची तरतूद करण्यात आली
होती. तथापि, शेतकऱ्यांच्या नावाने प्रभावशाली व्यक्तिंनीच हे अनुदान लाटले असून, त्यात खा.लोखंडे यांच्यासह अनेक बडे मासे
अडकतील, अशी शक्यताही डॉ. करडक यांनी व्यक्त केली. दरम्यान, या योजनेचा फायदा मिळविण्याच्या उद्देशाने २०२० साली शिर्डीचे खा. सदाशिव लोखंडे यांनी त्यांची पत्नी, दोन मुले आणि दोन सुना हे संचालक पदावर असलेल्या खेमानंद दूध आणि कृषी उत्पादक कंपनी लिमिटेडद्वारे या योजनेसाठी अर्ज केला. त्या कंपनीची तत्पूर्वीच्या पाच वर्षात एकाही रुपयाची उलाढाल नसताना, त्या कंपनीला तब्बल ३२ कोटी रुपयांच्या केंद्रीय योजनेस मंजुरी मिळाली. त्यापैकी १४.८० कोटी रुपये अनुदान या कृषी कंपनीस मंजूर झाले. दरम्यान, मार्च २०२४ अखेर, त्यांना ११.२० कोटी रुपये अनुदान प्राप्तही झाले आहे. प्रकल्पाची
वाटचाल अत्यंत संथ गतीने चालू असल्याचे कळते. शेतकरी उत्पादक कंपनीसाठी अनुदान देण्याचे नियम नाबार्ड, जागतिक बैंक, केंद्र शासन, राज्य शासन यांनी वेळोवेळी जाहीर केलेले असतात. परंतु या योजनेला हे निकष लागू करण्यात आले नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब आहे. वित्तीय संस्थांनी कर्ज देताना या नियमांकडे डोळेझाक केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. या सर्व प्रकारात, खासदार पदावर असणाऱ्या सदाशिव लोखंडे यांच्यासारख्या प्रभावशाली व्यक्तीने, संपूर्ण निवड आणि कर्ज मंजुरी प्रक्रियेवर प्रभाव टाकून त्यांच्या कुटुंबातील सदस्य हेच संचालक असणारे कंपनीला कोट्यवधी रुपयांचा लाभ मिळवून दिला आहे असे प्रथमदर्शनी लक्षात येते. त्यामुळे
खा. लोखंडे यांच्याबद्दल आम्ही राष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांकडे त्यांची खासदारकी रद्द होण्याबाबत विनंती अर्ज केला आहे. या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून खा. सदाशिव लोखंडे आणि अन्य प्रभावशाली व्यक्ती यांनी केलेल्या यांच्या पदाच्या दुरुपयोगाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि इतर संबंधित यंत्रणांकडे करावी अशी मागणी डॉ. करडक यांनी केली.
महायुतीमधील सहभागी नेत्यांवर
होणाऱ्या गैरकारभारांच्या आरोपांकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सातत्याने दुर्लक्ष
करतात. तसेच ते केवळ महाविकास आघाडीला टार्गेट करतात, असे आरोप अलिकडे सातत्याने होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता काही पुराव्यांसह भ्रष्टाचाराचा आरोप होत असल्याने या शेतकरी नेत्यांनी केलेल्या मागणीकडे ज्येष्ठ
समाजसेवक अण्णा हजारे कसे पाहतात, हे पाहणे आवश्यक आहे शेतकरी नेत्यांनी शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांच्यावर
गैरकारभाराचे गंभीर आरोप केलेले आहेत. त्यामुळे शेतकरी नेत्यांचे हे आरोप खरे की खोटे, याच्या खोलात जाण्याची तसदी अण्णा
हजारे घेतील का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे लोखंडे यांनी जेअनुदान
लाटल्याचा आरोप होत आहे, ते अनुदान शेतकऱ्यांच्या वाट्याचे असल्याने त्यावर गांभीर्यानेच विचार व्हायला हवा, असाही
मतप्रवाह आहे.शेतकऱ्यांच्या सर्वसामान्य कंपन्या आणि प्रभावशाली व्यक्तीच्या कंपन्या यांच्यामध्ये प्रचंड भेदभाव करून सर्वसामान्यांवर अन्याय करणाऱ्या दोषींना शिक्षा मिळवून द्यावी, अशी विनंती करणारे पत्र शेतकरी नेते अनिल घनवट व डॉ. भारत करड यांच्या सहीने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे करण्यात आली आहे.