इतर

नेप्तीत शिवमहापुराण संगीत ज्ञानयज्ञ कथेला प्रारंभ.


अहंदनगर /प्रतिनिधी
अहमदनगर नगर तालुक्यातील नेप्ती येथे श्रीराम नवमी निमित्त श्रीराम सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम मंदिरासमोर शिवमहापुराण संगीत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे .

यावेळी श्रीराम विजयग्रंथ व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा होणार आहेत. या सोहळ्याचे आयोजन दि.११ ते १८ एप्रिल दरम्यान करण्यात आले आहे. ग्रंथ पूजन व प्रतिमा पूजन करून या सोहळ्याचे उद्घाटन ह. भ. प. रामेश्वर महाराज चव्हाण सुकळीकर व मंडळाचे अध्यक्ष बबन फुले यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कथेला प्रारंभ करण्यात आला . या कथेला तबला संदीप महाराज नरके, शिंथवादक व गायक गौरव महाराज झुंजे, साऊंड सिस्टिम तुषार भुजबळ तर बासरी वादक बाबासाहेब भोर सर यांची साथ संगत असणार आहे.

यावेळी श्रीराम सेवा मंडळाचे अध्यक्ष बबन फुले, उपाध्यक्ष बाळासाहेब होळकर , माजी सरपंच दिलीप होळकर, बबन बेल्हेकर, रामदास फुले, बाळासाहेब बेल्हेकर , मारुती कावरे , चंद्रकांत खरमाळे, एकनाथ होळकर, अमोल चौगुले , श्रीनिवास महाराज जपकर , बबन शिंदे ,बाबासाहेब जाधव, विष्णू गुंजाळ, योगेश कुलकर्णी , प्रीती कुलकर्णी, बंडू रावळे, भानुदास फुले, राजू फुले, राजाराम जपकर, पोपट मोरे , जालिंदर शिंदे, प्रभाकर चहाळ, पाराजी होळकर, रावसाहेब इंगोले, सुरेश चत्तर, गुलाब होळकर ,दादाभाऊ फुले, रावसाहेब पुंड , बाबासाहेब रावळे ,दादू थोरात,दत्तू थोरात, शंकर इंगोले, श्रीराम सेवा मंडळाचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सोहळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. असून संपूर्ण गाव भक्तीमय झाला आहे. हा सोहळा गावकऱ्यांसाठी मोठी परवणी ठरतो. सोहळ्यानिमित्त मंदिर परिसर स्वच्छ करून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. सोहळ्याचे हे ३५वे वर्ष आहे.दि. ११ एप्रिल रोजी रात्री ८ ते ११ यावेळी कथा प्रवक्ते ह. भ. प.रामेश्वर महाराज चव्हाण सुकळीकर हे दिनांक ११ ते १८एप्रिल दरम्यान कथा सांगणार आहेत . दि. १७ एप्रिल रोजी सकाळी राम जन्माचे किर्तन होईल. दि. १८एप्रिल रोजी सकाळी ९ते ११ दरम्यान काल्याचे किर्तन होणार आहे. रावसाहेब भागीनाथ होळकर यांच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील भाविकांनी व ग्रामस्थांनी महाप्रसाद व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्रीराम सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button