ॲड. एम.एन.देशमुख महाविद्यालयास नॅक संस्थेचा (B++) दर्जा

विलास तूपे
राजूर प्रतिनिधी
आदिवासी बहुल क्षेत्रातील बेस्ट कॉलेज तसेच विविध पुरस्कार प्राप्त महाविद्यालयास दिनांक १ ते २ एप्रिल २०२४ रोजी नॅक कमिटी ने प्रत्यक्ष भेट देऊन मागील पाच वर्षातील कामकाजाचे असेसमेंट केले, व आपला लेखी अहवाल नॅक संस्था, बेंगलोर यांना पाठविला त्यानुसार महाविद्यालयास सदर संस्थेने बी प्लस प्लस* ( B++) हा मानांकित दर्जा दिल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भाऊसाहेब देशमुख यांनी दिली आहे.
नॅक समिती ने पाच वर्षाच्या काळात महाविद्यालयात राबविलेले विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, कोर्सेस, पेटंट,संशोधन,रोजगार निर्मिती, पर्यावरणीय समतोल, सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प,परीक्षा पद्धती, शिक्षकांचे सामाजिक व शैक्षणिक योगदान, विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा, नवनिर्मिती प्रकल्प, मुला मुलींचे वस्तीगृह व उपलब्ध सुविधा ,अध्यापनात अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर, माजी विद्यार्थ्यांचे योगदान इ. बाबतीत माहिती घेतली त्याच प्रमाणे आजी व माजी विद्यार्थी, संस्था प्रतिनिधी,प्राचार्य यांचेशी संवाद साधला.असेसमेंट साठी महाविद्यालयातील प्राचार्य, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे (IQAC) समन्वयक डॉ बी. के. टपळे , प्रा.रोहित मुठे, प्रा. एस.के.थोरात, तांत्रिक सहाय्यक सूरज साबळे, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेऊन माहिती उपलब्ध करून दिल्यामुळेच नॅक ने चांगला दर्जा दिला आहे.असे मत सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड. मनोहरराव देशमुख यांनी व्यक्त केले आहे.
या मिळालेल्या यशाबद्दल सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड.मनोहरराव देशमुख, सचिव टी.एन.कानवडे, कोषाध्यक्ष विवेक मदन, विश्वस्त मारुती मुठे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, शिक्षण तज्ञ ,व नागरिक यांनी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
