इतर
फुले ,आंबेडकर मानवतेची पूजा करणारे खरे महामानव -प्राचार्य भाऊसाहेब बनकर.

गुरुवर्य रा.वि.पाटणकर विदयालयात डॉ.आंबेडकर व महात्मा फुले जयंती साजरी.
अकोले/प्रतिनिधी-
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वातंत्र्य,समता,बंधुता ही महान तत्वे सांगितली.बहुजन सुधारले तर समाज सुधारेल.या विचारांचा आदर्श त्यांनी घेतला.त्यांचे कार्य दलितांसाठीच नव्हते तर संपूर्ण समाजासाठी होते.म्हणूनच मानवतेची पूजा करणारे खरे महामानव डॉ.आंबेडकर व महात्मा फुले होय.असे प्रतिपादन प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी केले.
सत्यनिकेतन संस्थेचे गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजूर येथे दोन्ही महामानवांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी प्राचार्य बनकर विचारमंच्यावरून बोलत होते.
यावेळी उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी,संजय व्यावहारे,जालिंदर आरोटे, संतोष कोटकर,अमोल तळेकर,अधिक्षक मच्छिंद्र ढगे यांससह शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी उपस्थित होते.
प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी पुढे विचार व्यक्त करताना जे समाजातील दीन,दलित,गरीब,दुर्बल आहेत त्यांना आगोदर उठवण्याचा प्रयत्न केला.ते सुधारले तर बाकीचा समाज आपोआप सुधारेल याची जाणीव महापुरुषांना होती.त्यांनी समाजात प्रथम सामाजिक क्रांती केली.समाज सुधारणा केली.अंधश्रद्धा अल्पावधीतच नष्ट केली.शिक्षणाचा प्रसार केला.असे विचार व्यक्त करत.सर्व परिवर्तनाचे मूळ हे विचार परिवर्तनातून होत असते.म्हणून आचरणात बदल करायचा असेल तर समाजाच्या विचारात बदल करावा लागेल.त्यासाठी वाचन महत्वाचे आहे.देशात वाचन संस्कृती नष्ट होत चालली आहे.राष्ट्र निर्माण करणाऱ्या महापुरुषांचे विचार, त्यांची पुस्तके वाचली जात नाही.त्यांचा खरा इतिहास लोकांना समजत नाही.त्यामुळे काही धूर्त लोक चुकीचे विचार समाजात पसरवित असल्याची खंत व्यक्त केली.
यावेळी शिक्षिका बीना सावंत,वंदना सोनवणे,शिक्षक संतराम बारवकर, नानासाहेब शिंदे यांनी महापुरूषांच्या कार्याला उजाळा दिला.विद्यार्थीनी प्रतिक्षा देठे,प्रियंका तपासे यांनी गित गायनातून महापुरुषांचे कार्य प्रगट केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक पाचपुते यांनी केले. सुत्रसंचलन श्रीकांत घाणे यांनी केले. तर धनंजय पगारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
