आंबेडकर जयंती निमित्त चोभुत येथे सर्व रोग निदान शिबिर संपन्न,१४० रुग्णांची तपासणी.

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पारनेर तालुक्यांतील चोंभूत या गावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचे हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध, यांच्या प्रतिमांचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित उपासक व उपसिका यांनी सामुदायिक वंदना ग्रहण केली. विवीध कार्यकारी संस्थेचे चेअरमन दत्तात्रय कोल्हे, विविध कार्यकारी सोसायटी संचालक देवराम जमदाडे, डॉ.प्रियांका गायकवाड, डॉ.निखिल शिंदे,किसन गुंजाळ, खंडू म्हस्के, दत्त्तात्रय गाडेकर, मंगेश सोनवणे, अशोक म्हस्के, तात्यासाहेब माळी, रामदास पारखे, शहाजी जाधव, किरण शिंदे, नीलक्रांती तरुण मित्र मंडळाचे उपाध्यक्ष गणेश रामदास भालेराव, खजिनदार संगम भालेराव, सचिव मंगेश भालेराव, विजय भालेराव, राजु भालेराव, गंगाराम भालेराव, प्रणव भालेराव, सागर सोनवणे, प्रकाश म्हस्के, कैलास भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर व उपासक , उपसिका यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित विचार व्यक्त केले. यावेळी गायकवाड मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल विद्यमाने सर्व रोग निदान शिबिर घेण्यात आले.
या प्रसंगी डॉ. प्रियांका गायकवाड व डॉ. निखिल शिंदे यांनी उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी केली. या शिबिरात १४० नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. यावेळी परिसरातील बहुसंख्य उपासक, उपासिका, ग्रामस्थ उपास्थित होते.