राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत घुले तर कार्याध्यक्षपदी वसंतराव पवार

संगमनेर – शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संगमनेर तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत घुले तर कार्याध्यक्षपदी वसंतराव पवारआणि जिल्हा युवक उपाध्यक्षपदी शुभम वाकचौरे यांची निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे पत्र नुकतेच माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे ,युवक अध्यक्ष सौरभ देशमुख,ग्रंथविभाग प्रदेश सदश्य युसूफ चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत घुले हे मूळ पठारभागातील सावरगाव घुले येथिल रहिवाशी असून गेलया पस्तीस वर्षांपासून माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम करत आहे. लवकरच गाव तिथे शाखा हा उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे सावरगाव घुले येथील श्री क्षेत्र खंडोबा मंदिर देवस्थान ट्रस्ट वर चंन्द्रकांत घुले विश्वस्त म्हणून काम करत आहेत. त्यांच्या पत्नी नंदाताई घुले या पाच वर्षे सारोळे पठार गणात पंचायत समिती सदश्य होत्या. त्यावेळी पठारभागात तत्कालीन मंत्री मधुकर पिचड यांच्या माध्यमातून मोठा निधी घुले यांनी आणला होता. या भागातील रस्ते,पाणी , वीज आदी प्रश्नावर आंदोलनाच्या माध्यामातुन आवाज उठविला आहे.श्री क्षेत्र बाळेश्वर डेअवस्थां विकासामध्ये हि घुले यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. चंद्रकांत घुले यांना तालुका अध्यक्षपदाची संधी मिळाल्याने माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात,माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे,माजी आमदार रोहित पवार,रयत शिक्षण संस्थेचे संचालक मनोज कवडे , अगस्ती कारखान्याच्या व्हा. चेअरमन सुनीता भांगरे , जिल्हा बँकेचे संचालक अमित भांगरे,भारत गोर्डे, महेश सुपेकर, भाऊसाहेब धर्मा घुले,खंडोबा देवस्थानचे अध्यक्ष सीताराम घुले, सचिव गोरक्षनाथ मदने,विविध कार्य. सोसायटीचे चेअरमन संतोष बन्सी घुले आदीनी अभिनंदन केले आहे.