शिरुर शहरात भटक्या कुत्र्यांच्या प्राणघातक हल्ल्यात अनेक लहान मुले गंभीर जखमी.

नागरिकांच्या तक्रारीकडे नगरपरिषदेचे दुर्लक्ष!
शिरूर. प्रतिनिधी:-
दि. १५ एप्रिल रोजी शिरूर शहरातील बीसी हाऊसिंग सोसायटी आणि सय्यद बाबा नगर परिसरात दोन भटकी पिसाळलेल्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला. अनेक लहान लहान मुलांसह महिलांवर केला प्राणघातक हल्ला.
शिरुर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पुरेशी साधने उपलब्ध नाहीत त्यामुळे सर्वांना ससून दवाखान्यात रवाना करण्यात आले.
13 ऑक्टोबर 2023 रोजी नगरपरिषदे ने भटकी कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण मोहिमेला सुरुवात केली होती.
यासाठी सोसायटी फॉर अॅनीमल प्रोटेक्शन या संस्थेला ठेका देण्यात आलेला होता.. त्यात एका कुत्र्याला निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यासाठी 15 ते 20 हजार खर्च येणार आहे.
परंतु बहुजन मुक्ती पार्टी ने निर्बिजीकरण आणि लसीकरण चे सविस्तर चित्रिकरण करावे जेणेकरून भ्रष्टाचार होऊ नये आणि प्रमाणीक पणे प्रत्येक भटकी कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण व्हावे असे निवेदन दिले असता नगरपरिषदे ने दुसऱ्याच दिवशी निर्बिजीकरण शस्त्रक्रिया आणि लसीकरण मोहिम बंद केली ती आजतागायत सुरूच झाली नाही 7 महिने झाले.
परिणामी आज अनेक मुलांवर पिसाळलेल्या कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केला त्यात अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.
या वेळी फिरोज भाई सय्यद बहुजन मुक्ती पार्टी पुणे जिल्हा कार्याध्यक्ष, अशोक गुळादे यांनी समक्ष पहाणी करून जखमींना उपचारासाठी दवाखान्यात मदत केली परंतु ग्रामीण रुग्णालयाचे ही भोंगळ कारभार समोर आले, उपचारासाठी आवश्यक साधने आणि औषध उपलब्ध नसल्याने जखमींना थेट ससून रुग्णालयात रवाना करावे लागेल त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त करत बेजबाबदार आणि निष्क्रिय अधिकारी तसेच मुख्याधिकारी स्मिता काळे आणि आमदार, खासदार यांचा तिव्र निषेध करण्यात आला.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष फिरोज भाई सय्यद, अशोक गुळादे, माजी नगराध्यक्ष रवी ढोबळे, रमेश इसवे, सामाजिक कार्यकर्ते प्रितेश फुलडालिया उपस्थित होते.