रंधा येथील घोरपडा देवी मंदीर कामकाजा बाबतचे ते उपोषण आचारसंहिते मुळे स्थगित – विजय पवार

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील रंधा येथील श्री. घोरपडा देवी मंदीर ट्रस्ट मधील आर्थिक गैरकामकाजाची चौकशी करण्यासाठी अकोले तहसील कार्यालया समोर उपोषणाचा इशारा दिला होता परंतु लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने सदर उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्ते व रिपब्लिकन चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. विजय रमेश पवार यांनी दिली
श्री.घोरपडा देवी मंदीर देवस्थान
ट्रस्टचे गलथान कारभाराची चौकशी करण्यात यावी व सबंधीतांवर गुन्हे दाखल करावेत .देवस्थान परिसरातील भक्तनिवास व पार्कींग ठेका देवस्थान च्या दान व देणग्या रकमेचा हिशोब याचे लेखापरीक्षण करून देवस्थान मार्फत जनतेसमोर जाहीर करावे अशीं मागणी करत श्री विजय रमेश पवार यांनी दि २१ मार्च पासून तहसिल कार्यालय अकोले येथे सकाळी १०.०० वा. पासून बेमुदत उपोषणास बसणार असल्याचा इशारा देत त्यांनी निवेदन जिल्हा पोलीस अधिक्षक सहायक धर्मदाय आयुक्त ,अहमदनगर तहसीलदार अकोले यांना निवेदन दिले होते परंतु लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने आचार संहिता सुरू झाली आहे या काळात कायदा सुव्यवस्था बिघडू नये शांततेला गालबोट लागू नये यासाठी शेंडी भंडारदरा येथे जिल्हा बँकेचे संचालक अमितदादा भांगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी भागातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली या वेळी हे आंदोलन स्थगित करण्याची विनंती केल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंगळा पटेकर , विजय रमेश पवार यांनी सांगितले