अहमदनगर
पळवे खुर्द येथे गीताई समूहाचा दुसरा वर्धापन दिन साजरा

दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
:- सीआरपी मंगलताई पळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पळवे खुर्द मठ वस्ती येथील गीताई गीताई महिला उद्योग समूहाचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
अध्यक्षा मनीषा गाडीलकर, सचिव नंदा दरेकर, तसेच प्रिया तरटे यांनी गटाच्या पुढील वाटचाली विषयी माहिती दिली तसेच सरपंच जनाबाई तरटे यांनी गट सुरळीत चालू राहण्याविषयीची माहिती दिली व गटाच्या दैनंदिन होत असणाऱ्या कार्यक्रमाविषयी कौतुक केले.
या ठिकाणी गटाच्या सीमा गवळी, शितल गवळी, अनिता गवळी, सुवर्णा गवळी, लता पवार,सुनिता साबळे, सुजाता शेळकेसह सर्व सदस्य उपस्थित होते.उपस्थितीमध्ये केक कापून गटाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन प्रिया तरटे यांनी केले.
