आजचे पंचांग व राशिभविष्य दि.२१/०४/२०२४

आजचे पंचांग
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ०१ शके १९४६
दिनांक :- २१/०४/२०२४,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४७,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- चैत्र
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- त्रयोदशी समाप्ति २५:१२,
नक्षत्र :- उत्तरा समाप्ति १७:०८,
योग :- व्याघात समाप्ति २७:४४,
करण :- कौलव समाप्ति ११:५९,
चंद्र राशि :- कन्या,
रविराशि – नक्षत्र :- मेष – अश्विनी,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०५:१२ ते ०६:४७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:१९ ते १०:५३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५३ ते १२:२७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०२:०३ ते ०३:३७ पर्यंत,
❀ दिन विशेष:
प्रदोष, अनंगव्रत, भा. वैशाख मासारंभ, महावीर जयंती, अमृत १७:०८ नं., घबाड १७:०८ नं. २५:१२ प.,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- वैशाख ०१ शके १९४६
दिनांक = २१/०४/२०२४
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
बोलण्यातून प्रभुत्व दाखवाल. कामात चांगले बदल घडून येतील. काहीसा मानसिक ताण जाणवेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. घरगुती कामाचा ताण जाणवेल.
वृषभ
कलात्मक दृष्टीकोन ठेवाल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. झोपेची तक्रार जाणवेल. फसवणुकीपासून सावध रहा. लबाड लोकांपासून दूर राहावे.
मिथुन
सौख्यात रमून जाल. कौटुंबिक वातावरण प्रसन्न राहील. आवडीचे पदार्थ खायला मिळतील. अधिकारी व्यक्तींचा संपर्क होईल. संपर्कातील लोकांचा स्नेह वाढेल.
कर्क
स्वभावात काहीसा हट्टीपणा येईल. नवीन मित्र जोडाल. कामाची धांदल उडेल. घरातील स्त्रियांची मदत होईल. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.
सिंह
अती भावनाशील होऊ नका. तुमच्या कलेचे सादरीकरण करता येईल. उष्णतेचा त्रास जाणवेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. वरिष्ठांच्या कौतुकास पात्र व्हाल.
कन्या
परोपकारी दृष्टिकोन ठेवाल. गुरुकृपेचा लाभ होईल. दिवस काहीसा आरामात घालवाल. गोष्टी मनासारख्या घडून येतील. घरातील थोरांचे सहकार्य लाभेल.
तूळ
पत्नीशी क्षुल्लक कारणांवरून विसंवाद घडू शकतो. गुंतवणुकीचा लाभ घ्यावा. कामाचा वेग वाढेल. घरातील परिस्थितीचा योग्य अंदाज घ्यावा. वादाचे मुद्दे बाजूस सारावेत.
वृश्चिक
भावंडांशी मतभेद संभवतात. अनाठायी खर्च होऊ शकतो. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल. सहकार्याची भावना जपाल. जोडीदाराचे वर्चस्व राहील.
धनू
कौटुंबिक प्रश्न सामोपचाराने हाताळा. बोलताना शब्द जपून वापरावेत. गरज असेल तरच खर्च करावा. हाताखालील लोकांचे सहकार्य लाभेल. नसती काळजी करत बसू नका.
मकर
रागावर नियंत्रण ठेवा. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. भागिदारीतून चांगला लाभ मिळेल. क्षुल्लक गोष्टींवरून चिडू नका.
कुंभ
सामुदायिक गोष्टींचे भान ठेवा. रखडलेले कामे पुढे सरकतील. घरात टापटीप ठेवाल. जवळचे मित्र भेटतील. शेतीच्या कामातून लाभ मिळेल.
मीन
कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. कामातून चांगला धनलाभ होईल. गप्पांमध्ये गुंग व्हाल. कष्टाचे योग्य चीज होईल. मित्रांशी मतभेद संभवतात.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर