
अकोले/प्रतिनिधी-
अकोले तालुक्यातील महाकाळ डोंगराच्या पायथ्याशी असलेले प्रभू श्रीराम चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मौजे एकदरे, पिंपळदरावाडी,चंदगीरवाडी,
जायनावाडी,बिताका ग्रामस्थ व वारकरी भाविकांच्या सहकार्याने व थोरा मोठ्याच्या आशीर्वादाने, संत निवृत्तीनाथ वारकरी सांप्रदायिक सेवा ट्रस्ट वर्धापनदिन सोहळा व श्रीराम जन्मोत्सव सोहळा अतिशय भक्तिमय आनंदात संपन्न झाला.सकाळी नऊ ते अकरा ह.भ.प.गोविंद महाराज जाधव इंदोरे यांचे कीर्तन झाले. त्यानंतर सकाळी ११ ते १२ या वेळेस श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. दुपारी १२ ते १.३० प्रमुख अतिथी सत्कार समारंभ व मनोगत व्यक्त झाले.दुपारी १.३० ते ४.३० यावेळेस महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला.
आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते काळू भांगरे यांनी नवीन पिढीवर संस्कार होणे अपेक्षित असतील.भगवान श्रीराम यांचा आदर्श जोपासला पाहिजे. त्याशिवाय मानवी जीवनाला एक सुंदर जीवन जगता येणार नाही.त्यासाठी श्रीराम यांच्या चारित्र्यातील पैलुचा नवीन पिढीने अवलंब केला पाहिजे.राम हा भारतीय संस्कृतीचा विरासत आहे. बापाच्या वचनासाठी सर्वश्यांचा त्याग करणारा राम हा आदर्श पूर्वज असून एका स्त्री अभिलेषीपोटी संपूर्ण राज्याचा नाश करणारा रावण ही विकृती आहे.म्हणून प्रत्येकाने राम यांच्या जीवन चारित्र्यातून बोध घेऊन आदर्श जीवन व्यथीत केले पाहिजे.असे विचार व्यक्त केले.
शेंडी गावचे माझी सरपंच दिलीपराव भांगरे यांनी,रामाच्या विचारांची आपल्याला गरज आहे.रामाने जे आचरण केले जे कार्य केले जे बंधू प्रेमापोटी त्यांच्या बंधूनी काम केले चौदा वर्ष वनवासाला जात असतानी त्यांच्या बंधूंनी घरी न रहाता त्याच प्रमाणे ज्या गादीवर बसत असताना भरत राजाने त्यांची पादुका ठेवून त्याची पूजा केली.आज खऱ्या अर्थाने आपल्या समाजाला अशा भावांचे अशा वडीलधाऱ्या माणसांची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.
यावेळी दिलीप भांगरे (माजी सरपंच शेंडी), बुधा सोमा येडे (मा.मुख्याध्यापक अडसरे), ह.भ.प. काळू महाराज भांगरे जायनावाडी, ह. भ. प.संतोष महाराज जाधव कोकणवाडी,ह. भ.प. चंद्रभागा ताई गोडे शिवाजीनगर,ह.भ.प.एकनाथ महाराज भांगरे पिंपळाचीवाडी,ह.भ.प.देवराम बाबा महाराज भांगरे पिंपळदरावाडी, ह.भ. प.निवृत्ती महाराज भांगरे पिंपळदरावाडी,ह.भ.प.पंढरी महाराज चौरे चंदगीरवाडी,ह.भ.प.पांडुरंग महाराज भांगरे जायनावाडी,ह.भ.प.हर्षल महाराज भांगरे जायनावाडी, ह.भ. प.आकाश महाराज भांगरे जायनावाडी, योगेश भांगरे सरपंच एकदरे,बाळू डगळे सरपंच जायनावाडी,सचिन भांगरे सरपंच पिंपळदरावाडी,यशवंत बेंडकोळी सरपंच चंदगिरवाडी, कार्यकारी संचालक मंडळ ,संत निवृत्तीनाथ वारकरी सेवा ट्रस्टचे सर्व कर्मचारी, कार्यकारी संचालक मंडळ एकदरे,श्री मोखाजी बाबा आदिवासी सामाजिक सेवा संस्था एकदरेचे सर्व कर्मचारी, श्री भैरवनाथ मंदिर कार्यकारी संचालक मंडळ जायनावाडी चे सर्व कर्मचारी, समस्त भजनी मंडळ एकदरे,चंदगिरवाडी, पिंपळदरावाडी,जायनावाडी, बिताकाचे सर्व भजनी मंडळ, मंडप व लाईट डेकोरेशन संपत भांगरे जायनावाडी,पाणी व्यवस्था सहकार्य विकास भांगरे एकदरे आदींसह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मार्गदर्शन काळू भांगरे यांनी केले. तर नंदू भांगरे यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.