अहमदनगरइतर

आमदार निलेश लंके यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन.   

        इगतपुरी तालुक्यातील गौरी च्या संशयास्पद मृत्यू शी धनगर समाज बांधवाचा संबंध नाही.  –   लंके                     

 
अहमदनगर /प्रतिनिधी

इगतपुरी तालुक्यातील गौरी च्या मृत्यू वरून धनगर समाज बांधवांच्या बाबतीत 5 ते 6 दिवसांपासुन सोशल मिडीया, वर्तमानपत्रांच्या माध्यमातुन बदनामी चालु आहे. इगतपुरी तालुकयातील कातकरी पाडयांवरच्या मुलांची खरेदी करण्यात आल्याची धक्कादायक बातमी वास्तव समोर आले आहे. नाशिक जिल्हयातील इगतपुरी तालुकयातील गौरी आगिवले या बालिकेच्या संशयास्पद मृत्यु झालेला आहे. सदर या घटनेशी माझ्या मतदार संघातील धनगर बांधवांचा संबंध नाही. मेंढपाळ करण्यासाठी आदिवासी भागातील कातकर समाजातील लहान मुले नाहीत पण तरी सुध्दा पोलिस प्रशासन रात्री पहाटे त्यांच्या धनगर वाडयावर जाऊन या घटनेबाबत तपास करीत आहेत त्यामुळे हा अशिक्षित धनगर बांधव घाबरलेला असुन. माझ्या असे निर्देशनास आले की हा धनगर बांधव हा पुर्णपणे अशिक्षित असुन त्यांच्या महिलाही अशिक्षित आहे. हा समाज आठ महिने मेंढया चारण्यासाठी पुणे, नाशिक,मावळ अश्या राज्यातील अनेक भागात जात असतो अशी भयभित परिस्थिती राहीली तर त्यांना बाहेर गावी मेंढया चारण्यासाठी जाण्यास अडचण होईल व समाजात त्यांना ब्लैकमेल करुन त्यांना आर्थिक मागणी होऊ शकते. त्यामुळे हया धनगर बांधवांना प्रशासनाच्या माध्यमातुन योग्य ते मार्गदर्शन करा व जे आरोपी असतील त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करा व ज्यांचा या घटनेशी कुठलाही संबंध नाही.त्यांना विनाकाराण पोलिस प्रशासनाच्या माध्यमातुन कुठलाही त्रास होणार नाही या मागणीचे निवेदन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना देण्यात आले

यावेळी आमदार निलेश लंके याचे समवेत सरपंच अँड.राहुल झावरे, राजू कोळेकर, मारुती कोकरे, आनंदा तांबे, अरुण तांबे, नामदेव कोळेकर, गजानन कोळेकर, गणपत कळणार, चिंध्या पोकळे, साळू पोकळे आधीसह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button